बाळासाहेब ..
थिटी  पडे  तलवार

अशी वाणीला धार

मुठ  विचारांची घट्ट

लढवय्या ते सरदार

 

कुणाचे का उपकार

न ठेवी  काही उधार

देताना दीन दुबळ्या

तेवढाचं कर्ण  उदार

 

जसे  मनी  सुविचार

तसाचं सदैव आचार

आठवणींनी तयाच्या

होती सहज  संस्कार

 

देता  मराठी आकार

प्रगतविचार स्विकार

वाणीत  सूर्याचे  तेज

तरी  नव्हता  विखार

 

मिळे  कधी  तुरे हार

कधी कधी  होय हार

रपेट प्रगती  मार्गावर

घटृ  मांड  घोडे स्वार

 

पाहता  चित्र  तस्वीर

सळ  सळते   रूधीर

विरोधकांचेही   कसे

अलगद झुकते  शीर

 

- हेमंत मुसरीफ पुणे