उस्मानाबाद/प्रतिनिधी. - शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या 'पद्मिनी महिला सहकारी पतसंस्थेचा' वर्धापन दिन अतिशय साधेपणाने व सामाजिक कार्य घेऊन संपन्न करण्यात आला. या वर्धापन दिनाचे संपूर्ण नियोजन 'विवेकानंद युवा मंडळ' यांनी केले. वर्धापन दिनात आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून इतर कार्यक्रमाला मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यात नेहमीच कार्य बजावणाऱ्या विवेकानंद युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पतसंस्थेच्या कर्मचारी, व्यवस्थापक व उपस्थित ग्राहक यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालय व परिसरात एकूण १५० मास्कचे वाटप करण्यात आले. रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मास्कचे वाटप करून त्यांना सोशल डिस्टंसिंग बद्दल संदेश देखील देण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पतसंस्थेचे मार्गदर्शक श्री.सिद्धेश्वर मोरे साहेब, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री. भारतराव साळुंके साहेब, संचालक श्री.उंबरे, व्यवस्थापक श्री.संतोष मोरे, कर्मचारी ज्योत ढगे, सौ.ढगारे मॅडम, विवेकानंद युवा मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते बाळकृष्ण साळुंके, महेंद्रप्रताप जाधव, शुभम मगर, किरण जाधव, स्वप्नील देशमुख व आदी ग्राहक व कार्यकर्ते उपस्थित होते.