मनपा सफाई कामगारांच्या बँकेतून नियमित मजूरीसाठी मराठा लिबरेशन टायगर संघटनेचे आमरण उपोषण सुरु

लंातूर,दि.३१ः लातूर शहर मनपामध्ये खाजगी करार पध्दतीने शहर स्वच्छतेचे काम करणार्‍या सफाई कामगारांची मजूरी ही नियमित आणि तीही वैयक्तिक बँक खात्यावरच करावी आदी मागण्यांसाठी मराठा लिबरेशन टायगर संघटनेचे महेश गुंड व पदाधिकर्‍यांनी दि.३१ जानेवारी २०२० पासून महापालिकेसमोर आमरण उपोषणक सुरु केले आहे.
या आधुनिक शेाषण वेटबिगारीची थोडक्यात माहिती अशी की, लातूर शहर मनपामध्ये बाह्य खाजगी संस्थेकडून सफाई विभागामध्ये गेली १५ वर्षांपासून सुमारे ७०० महिला व ५०० पुरुष मजूर निश्‍चित मजूरीवरअखंडपणे सेवा करतात,मात्र या मजूरंाना त्यांची मजूरी ही ३ ते ४ महिन्यांनीच मिळते.ते पण हातावर दिले जाते. यांनी सुट्टी वा रजा नाही. यांच्यावर मनपाच्या स्वच्छता निरीक्षकांचे नियंत्रण असते. आणि मालक हे खाजगी कंत्राटदारआहेत. यांना किमान व समाज वेतन हक्कापासूनही वंचितच ठेवले आहे, यांना कामगाराच्या  फारश्या सोयी वा सवलती पण नाहीत, त्यामुळे यंाची अडवणूक  व शोषण होत आहेत. त्यामुळे मराठा लिबरेशन टायगर संघटनेने, एक हितचिंतक, सहानूभूतीदार म्हणून,सदर गंभीर प्रश्‍नांचा संवेदनशीलपणे अभ्यास केला आणि मनपा मुख्य प्रशासनास यासंबंधी प्रमुख अशा १२ मागण्यांचे  निवेदन, दि.२८ ऑगस्ट २०१९ रोजी रितसर सादर केले मात्र अद्यापपर्यंत त्यांनी न्याय दिला नाही.त्यामुळे संघटनेच्यावतीने सदर मागण्यांकरिता ३१ जानेवारी  २०२० पासून महेश गुंड, शाम माने, समीर शेख, सुरज शिंदे, अजय शिंदे, दत्ता पवार, श्रीनिवास बडूरे व अखिलेश आयलाने या आठ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुुरु केले आहे.या मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.
या आमरण उपोषणाला पहिल्या दिवशी नरेश गुणाले, भीमराव गडेराव,रहीम शेख, याच्यासह कोरणेश्‍वरआप्पा स्वामी, शिवानंद हैबतपूरे, रामकुमार रायवाडीकर,संजय व्यवहारे,विलास चक्रे, ऍड. अनुप पात्रे,रुपेश शंके, बालाजी जाधव, कृष्णा देशमुख आदिंनी भेटी देवून पाठिंबा दिला आहे.