लातूर :- लातूर जिल्ह्यातील दि.१६ जुलै रोजी तब्बल ४६२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले होते. त्यातील १०७ अजूनही प्रलंबीत आहेत. तर ६४ नवीन कोरोनासंक्रमित रुग्ण आढळून आलेले आहेत. एका रुग्णाचा उपचारादरम्यान लातूरात मृत्यूही झालेला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरानाग्रस्त रुग्णांची संख्या ९७३ वर पोहोचलेली आहे. तर ४४ जणांचे मृत्यूही झालेले आहेत.
लातूर जिल्ह्यात आजपर्यंत ८६११ व्यक्तींचे स्वॅब तपासणी करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये ९७३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४५२ असून उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ४७७ एवढी आहे. १६ जुलै रोजी तब्बल ४६२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले होते. त्यामधील १०७ जणांचे अहवाल अद्वाप प्रलंबीत आहेत. नवीन ६४ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत.
पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये कोराळी ता.निलंगा १, दत्त नगर निलंगा १, सी.आर.पी.एफ कॅम्प लातूर ७, विशाल नगर २, साळे गल्ली १, पानचिंचोली ता. निलंगा १, अहिल्यादेवी होळकर नगर लातूर १, गुमास्ता कॉलनी लातूर २, शाम नगर लातूर १, पठाण नगर लातूर १, लातूर रोड ता.चाकूर ७, नागेशवाडी ता. चाकूर १, देवर्जन ता. उदगीर २, विकास नगर उदगीर ३, हावगी स्वामी चौक उदगीर १, उदगीर १, अप्पाराव चौक उदगीर १, खडकाळी गल्ली उदगीर १, तळवेस उदगीर १, अशोक नगर उदगीर १, कासारशिरसी ता. निलंगा २, गवळी गल्ली लातूर १, गुळटेकडी जुना औसारोड लातूर १, माताजी नगर लातूर १, इस्लामपुरा लातूर १, आदर्श कॉलनी लातूर १, तळेगाव ता. देवणी १, विळेगाव ता. देवणी २, नाथ नगर औसा ४, औसा १, कालंग गल्ली औसा १, दापका निलंगा ६, रामकृष्ण नगर निलंगा १, अहमदपूर ३ यांचा समावेश आहे.व आणखी २० जण पॉझीटीव्ह आले आहेत ते असे की लातूर १३, निलंगा ३ अहमदपूर 4 असे वाढले आहेत.
उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू
येथील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचारादरम्यान शहरातील सराफ लाईन लातूर येथील एका ६३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. सदरील रुग्णास मधुमेहाचाही आजार होता. लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता ४४ वर पोहचलेली आहे.