- हेमंत मुसरीफ पुणे.
शिवबाचे अनुयाई
हिंदू हृदय सम्राट
विरळा असा नेता
वेगळा त्यांचा घाट
कणा सदैव ताठ
आवाज खडाखाट
देशभक्ती ठासली
अंतरी भरली दाट
भीती असते काय
दुबळेही होती धीट
भले भले ते झुकले
जाहले सरळ नीट
दाविली त्यांनी वाट
अंतीम जिथे पहाट
शिश अलगद झुके
असे ते शक्ती पीठ