-हेमंत मुसरीफ पुणे
असे अति धार धार
संप नावाचे हत्यार
बोथट होईल परंतु
वापरता वारं वार
तह शह झाल्यावर
अचूक करावा वार
जखमा प्रदिर्घ राही
विचार व्हावा त्रिवार
कधी दिसता हत्यार
होईल दुष्मन गार
अलगद सत्ता हाती
न करताचं प्रतिकार
कुणी करती व्यापार
मोह वाटतीलं अपार
नितीमत्ता निखळता
निष्प्रभ ठरेल हत्यार