लातूर (प्रतिनिधी):-मराठवाड्याचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर असून तो सुटण्यासाठी मागील काळात आम्ही सोबत काम करून त्याबाबत वेळोवेळी चर्चाही केलेली आहे. या पाणी प्रश्नी माजी मंत्री पंकजताई मुंडे यांनी घेतलेली भुमिका आणि त्यासाठी औरंगाबाद येथे केलेले उपोषण त्यासाठी त्यांच्यासोबतच असून आगामी काळातही घेण्यात येणार्या भुमिकेबाबत आपण त्यांच्यासोबतच राहू असे आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे.मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटावा याकरिता आम्ही पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी पुढाकार घेतलेला आहे. त्याचबरोबर यासाठी आवश्यक पाठपुरावाही करण्यात येत आहे. मराठवाड्याचा पाणीप्रश्न अतिशय गंभीर असून तो सुटावा हीच आमची भुमिका आहे. या प्रश्नाकरिता माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जी भुमिका घेवून औरंगाबाद येथे लाक्षणीक उपोषण केले. त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. या प्रश्नाकरिता पंकजाताईंसोबत वेळोवेळी चर्चा करून हा प्रश्न सुटण्यासाठी आगामी काळात कोणती भुमिका घ्यायची याबद्दलही सातत्याने चर्चा केलेली आहे. वास्तविक त्यांनी मांडलेली भुमिका अतिशय योग्य असून हा पाणी प्रश्न सुटावा याकरिता आम्ही पंकजाताईंच्या सोबतच आहोत असे आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे.
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी पंकजाताईंच्या सोबत-आ.पाटील