लातूर (प्रतिनिधी):-राज्यात महाविकास आघाडीचे सरकर स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाच्या विस्तारात लातूरचे सुपूत्र शहराचे आ.अमित देशमुख यांची कॅबिनेट मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उदगीरचे आ.संजय बनसोडे यांची राज्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील दोघांना मंत्रीमंडळात संधी दिली गेल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही मंत्र्यांचा नागरी सत्कार लातूरकरांच्यावतीने आज सायंकाळी ५ वाजता शहरातील आंबेडकर पार्क याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
अमित देशमुख यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुराही त्यांच्याकडेच आली आहे. त्याचबरोबर आ. संजय बनसोडे यांचीही मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागलेली आहे. या दोन्ही नूतन मंत्र्यांचा नागरी सत्कार उद्या प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून करण्यात येत आहे. या सत्कार सोहळ्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून या नागरी सत्कार व स्वागत समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ.सोमनाथ रोडे यांची नियुेी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून तिरंगा कपड्यांनी स्वागत कमांनीना अधिकच आकर्षक बनविण्यात आले आहे.
त्याचबरोबर या दोन्ही मंत्र्यांच्या अभिनंदनाचे फलक विविध पदाधिकारी व कार्यकत्यारनी शहरातील ठिकाणी लावलेले आहेत. हा सत्कार सोहळा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मैदानावर संध्याकाळी ५ वाजता पार पडणार आहे. मुख्य सत्कारमूर्ती आ. अमित देशमुख तर राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह आ. बाबासाहेब पाटील व आ. धीरज
देशमुख यांचाही सत्कार या सोहळ्यात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री दिलीपराव देशमुख राहणार असून राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यंाच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडणार आहे. यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर व लातूरचे प्रथम नागरीक विक्रांत गोजमगुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सत्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शहराच्या वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक, व व्यापारी क्षेत्रातील अनेक मान्यवर आपले योगदान देत आहेत.
लातूर जिल्ह्याच्या विकासाची पोकळी भरून काढण्यासाठी विद्यमान सरकारमध्ये सत्कार सोहळ्याचे जय्यत तयारी मागील अनेक दिवसापासून समितीच्यावतीने सुरू आहे. अमित देशमुख यांच्याकडे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्यासह सांस्कृतिक कार्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली असून जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुराही त्यांच्याच खांद्यावर आहे. आ.संजय बनसोडे राज्यमंत्री म्हणून मंत्रीमंडळात समाविष्ठ झाल्याने जिल्ह्यातील दोन लोकप्रतिनिधी मंत्री झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असून कॉंगे्रस, राष्ट ्रवादीसह शिवसेनेच्या कार्यकत्यारच्या आनंदालाही उधाण आलेले आहे. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
जिकडे तिकडे पालकमंत्री!
लातुरचे सुपुत्र आ. अमित देशमुख वैद्यकीय शिक्षणमंत्री झाले, पालकमंत्रीही झाले. त्यांचा टाऊन हॉलच्या मैदानावर जाहीर नागरी सत्कार केला जाणार आहे. शहरातील सर्व डिव्हायडर्समध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. एकूणच वातावरण पालकमंत्रीमय झालंय
ना.अमित देशमुख यांच्या नागरी सत्कारासाठी लातूरकर सज्ज