लातूर महानगरपालिकेत कॉगे्रस-भाजप मध्ये झुंपली !

कॉग्रेसच्या ठरावाला भाजपाचा विरोध;आज भाजपाची बैठक


लातूर (प्रतिनिधी):-मनपात भाजपाची सत्ता जाऊन अंत्यत चाणक्क्षपणे कॉगे्रसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी सदस्याच्या पळवापळवीची राजकीय खेळी करून कॉग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौरपदी विराजमान झाले आहेत.त्यांनी पद्भार हातात घेतल्यापासून मनपात कामाचा धडाका सुरू केला आहे.कालच महापौर गोजमगुंडे यांनी त्यंाच्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण सभा घेतली होती.या सर्वसाधारण सभेमध्ये भाजपाचे शैलेश गोजमगुंडे आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.या जुगलबंदीतच विद्यमान महापौर गोजमगुंडे यांनी लातूरकरांना ४७ कोटीच्या विकास कामाची भेट दिली आहे.यातच शहरात उभारण्यात येणार्‍या नाट्यागृहास नटवरिय श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे.पंरतु याच नाट्यगृहास पृर्वीच्या भाजपाच्या सत्त्ता असताना पुर्वीच याच नाट्यगृहास भारतरत्न स्व,अटलबिहारी बाजपेयी असे नाव देण्याचाही ठराव घेण्यात आल्याचे शैलेश गोजमगुंडे यांनी सांगितले आहे.परंतु विद्यमान महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केवळ अटटहासा पोटी हा ठराव घेतल्या असल्याचा आरोप भाजपाच्या नगरसेवकांनी केला असून या ठरावाच्या विरोधात भाजप जणआंदोलन उभारणार आहे.यासाठी आज व्यापक बैठकीचे आयोजन केले असल्याने पुन्हा मनपाच्या विकास कामात भाजप कॉग्रेसमध्ये मोठी धुसफुस सुरू झाल्याचे स्पष्ट होत असून केवळ मनपात राजकीय स्पर्धेतून लातूरच्या विकास कामाला खिळ बसत असून नेते मात्र एकमेकांना खिडीत गाटून विकासकामाला अडकाटी उभी करत असल्याचे चित्र लातूर मनपात दिसत आहे.
   मनपात भाजपाची सत्ता असताना लातूर शहरात नाट्यगृह उभारणी करणार असल्याची घोषणा करून त्यासाठी आवश्यक असणारा निधी शासनाकडून उपलब्धही करून घेतलेला आहे. या नाट्यगृहास भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात येवून त्यास मंजुरीही मिळालेली होती. यासोबतच या नाट्यगृहातील एका दालनास लातूरचे सुपूत्र नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव पारीत करून नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांच्या प्रती आदरभाव व्यक्त केलेला आहे. मात्र या नाट्यगृहाचे नाव आता नटवर्य श्रीराम गोजमगुंडे असे करण्याचा ठराव मनपा सर्वसाधारण सभेत घेण्यात आलेला आहे. सोमवार दि. २० जानेवारी रोजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव घेण्यात आलेला आहे. महापौर गोजमगुंडे यांच्या अट्टहासापोटीच हा ठराव घेण्यात आलेला असून नटवर्य श्रीराम गोजमगुंडे हे महापौर गोजमगुंडे यांच्या कुटूंबातीलच असल्याने सदर ठराव घेण्यात आलेला असावा. वास्तविक पाहता यापुर्वीच मनपाच्या सर्वसाधारण नाट्यगृहास भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी असे नाव देण्याचा ठराव घेण्यात आलेला होता. सदर नाव बदलून नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा घेण्यात आलेला ठराव अट्टाहासापोटीच घेण्यात आलेला आहे. या ठरावामुळे भाजपा नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात संतापाची लाट पसरलेली आहे. भाजपा या नामांतर ठरावाच्या विरोधात जनआंदोलन उभा करणार आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता शासकीय विश्रामगृह येथे व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी व संघटन सरचिटणीस गुरूनाथ मगे यांनी केलेले आहे.