साई भक्तांनो जरा सबुरीनं घ्या..
      संत महंतांची भूमी म्हणून महाराष्ट्र सर्वश्रूत आहेच, पण याच संत महांतांच्या अस्तित्वावरुन, आसण्या-नसण्यावरुनच मोठ्या प्रमाणात वाद-विवाद होतात. जगाला ‘सबका मालिक एक’चा संदेश देणार्‍या शिर्डीच्या साईबाबांचं जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातलं पाथरी की नगर जिल्ह्यातलं शिर्डी असा वाद सध्या सुरु आहे. या वादामुळे काल शिर्डी बंद आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनात 30 गावांनी सहभाग घेतला होता. एव्हाना त्यांच्या आचार, विचार, शिकवणी व समाजप्रबोधनपर गोष्टींना खुपच तोकड्या प्रमाणात अनुकरण वा अनुसरण केलं जात. एवढ नाही तर या विषयावर लोकं व्याख्यानं सुध्दा देतील, प्रवचने करतील पण त्यांनी पैसे घेऊन प्रकटलेल्या विचारांचा अंगिकार हा फक्त आयोजक, भक्त आणि सामान्य जनतेसाठीच असतो असे भासवून फक्त दक्षीणा घेऊनच समाधान मानतील हे ही तितकच खरं आहे. भारतातील कोणतही राज्य, भाग असो, येथे राष्ट्रीय संत, स्थानिक संत महात्मे, राष्ट्रपुरुष यांच्या नावावे समाजहित जोपासण्यापेक्षा त्यांच्यावरुन राजकारण आणि समाजविघातकच गोष्टी मोठ्या प्रमाणात होते आपणच अनेक वेळा अनुभवलय. एवढच काय तर या संत महात्म्यांच्या इतिहासाला लाजवेल अशा कृती सुध्दा यांच्या भोळ्या पण राजकारणाने झपाटलेल्या भक्तांकडुन होताना आपण अनेक वेळा पाहिलंय. सध्या सकल महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेल्या बाबीवर या माध्यमातून विवंचना करण्यासाठीचा हा वैचारिक प्रपंच प्रस्तूत करावा वाटतोय. आपल्या अस्तित्वात वा त्यानंतर सुध्दा श्रध्दा आणि सबुरीची शिकवण देणार्‍या साई बाबांच्या भक्तांना आज बाबांनो तुमची श्रध्दा अपरंपार आहे पण तुमच्या साई बाबांच्या जन्मस्थळवरुन वाढलेल्या वादांतिरेकात सबुरीचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येतोय हेच केवळ म्हणण्याची वेळ आता आम्हा लोकांना आली आहे. ज्या साई बाबांनी आपल्या अस्तित्वात लोकांना अतोनात विनंती करुन सांगितले होते की बाबांनो मला संत, महात्मा किंवा देवाचा दर्जा देऊन त्यावर समाजाला, अप्रत्यक्षात समाजातील वेगवेगळ्या घटकांना वेठीस धरु नका, किंवा त्यांची श्रध्दातिरेकाने लूट करु नका. असे असताना त्यांच्या त्या वचनाच्या अगदी विरोधाभासी वृत्तीने त्यांच्या म्हणजे साई बाबांच्या नावाने शिर्डीमध्ये अक्षरशः दुकानदारी मांडून ठेवली आहे. मान्य आहे आपली साई बाबांवर श्रध्दा आहे त्याच श्रध्देपोटी आपण रस्त्यावर उतरलात पण श्रध्देच्या पुढे त्यांनी सबुरी म्हणजे संयम बाळगण्याची ही विनंती केली होती. शिर्डीचे नव्हे तर देशातील अनेक देवी, देवतांच्या धर्मस्थळ, भक्तीस्थळे किंवा तिर्थक्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात भक्तांची लूट मांडून ठेवलेली आहे. देवाच्या नावानं लूट करणारे एकीकडं तर दुसरीकडं राजकारणाच्या माध्यमातून दिवसाढवळ्या भारतावर दरोडा घालणारी ही मंडळी भक्तांना आणि कार्यकर्त्यांना भडकावून केवळ आपल्यच देशात म्हणजे भारतातच अशी कृत्य करु शकतात. जगाला ’सबका मालिक एक’चा संदेश देणार्‍या शिर्डीच्या साईबाबांचं जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातलं पाथरी की नगर जिल्ह्यातलं शिर्डी असा वाद सध्या सुरु आहे. या वादामुळे काल शिर्डी बंद आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनात 30 गावांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारत पाथरी साईबाबांचं जन्मस्थान असल्याचं संबोधत या परिसराच्या विकासासाठी 100 कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा शिर्डीकरांनी जोरदार विरोध करत बंद पुकारण्यात आला होता.
पाथरी साई जन्मस्थळ विकास आराखडा असं नाव दिलेल्या आराखड्यातून साई जन्मस्थळ हा उल्लेख काढून टाकण्याचं मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत मान्य केलं. त्यामुळे शिर्डीकरांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र पाथरीकर यावर काय भूमिका घेतात यावर हा वाद पुढे चालू राहणार की मिटणार ते अवलंबून आहे. पाथरीच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी 100 कोटी रुपये जाहीर केले होते. त्या विकास आराखड्याच्या नावात साई जन्मस्थळ असा उल्लेख केल्यानं हा वाद निर्माण झाला होता. साईबाबांनी कधीच जन्मस्थळाचा उल्लेख केला नव्हता, त्यामुळे तो उल्लेख काढून टाकावा अशी मागणी करत शिर्डीकर संतप्त झाले होते. तर पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा दावा पाथरीकर करत होते. शिर्डीत याविरोधात आंदोलन छेडण्यात आलं होतं. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत बैठक बोलवली होती. या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान करण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले आहेत. मात्र आता पाथरीकर काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. जगाला ’सबका मालिक एक’चा संदेश देणार्‍या शिर्डीच्या साईबाबांचं जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातलं पाथरी की नगर जिल्ह्यातलं शिर्डी असा वाद सध्या सुरु आहे. या वादामुळे काल शिर्डी बंद आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनात 30 गावांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारत पाथरी साईबाबांचं जन्मस्थान असल्याचं संबोधत या परिसराच्या विकासासाठी 100 कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा शिर्डीकरांनी जोरदार विरोध करत बंद पुकारण्यात आला होता. अशा परिस्थितीत साई भक्तांनी साईंच्या शिकवणीचा आणि त्यांच्या सर्व धर्म समभाव या तत्वांचा अंगिकार करत त्यांच्या सहिष्णूतावादी विचारांना प्राबल्य देण्या बरोबरच सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रासह शिर्डी परिसरात गढूळ झालेल्या वातावरणावर सबुरीने मार्ग काढावा हिच अपेक्षा ठेवणे सध्या तरी एक सामान्य नास्तिक तथा तटस्त नागरिक म्हणून कळकळीने सांगावे वाटतेय.