राजकिय गरळ ओकण्यासाठीच व्यासपिठाचा का होतोय वापर?
उस्मानाबादकरांच्या
अपेक्षेला तिलांजली
उस्मानाबादेत मराठी साहित्य संमेलन घेऊन मराठी साहित्यात उस्मानाबादकरांचही
योगदान लाभाव या अपेक्षेने साहित्य संमेलन यशस्वीरित्या पारपडले खरे पण येथे अध्यक्षांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि मराठीचा देखावा करुन केलेली राजकिय चिखलफेक ही उस्मानाबादकरांची घोर
उपेक्षाच केल्याचं स्पष्ट झालं आहे यामुळे उस्मानाबादेतील स्थानिक साहित्यीकांतून नाराजीचा सूर निघत आहे.
उस्मानाबाद ः आजकाल मराठी साहित्य व नाट्य संमेलने म्हणजे केवळ राजकिय गरळ ओकण्यासाठीचे व्यासपिठे झालेत कि काय असाच अनुभव येताना दिसतोय. अशा व्यासपिठांच्या अध्यक्षपदासाठी निवडल्या जाणार्या ज्येष्ठांचीही सध्या साठीबुध न्हाटी प्रमाणे बौध्दीक दिवाळखोरीची प्रदर्शने मराठी जनतेला अनुभवावयास मिळत आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटतेय की, फादर दिब्रिटोसर खरच मराठी साहित्य संमेलनांची दिशा भरकटलीय, राजकिय गरळ ओकण्यासाठीच व्यासपिठाचा होतोय वापर.
संपूर्ण महाराष्ट्रासह सकल साहित्य पंढरीचे लक्ष असलेले ९३ वे मराठी साहित्य संमेलन परवा उस्मानाबादेत पार पडलं. येथे मराठी साहित्य संमेलनाची मोठ्या प्रमाणात उपेक्षा होताना अनुभवास आली. साहित्य संमेलनातून साहित्य संवर्धन आणि साहित्तीकांच्या साहित्यांचा ओहापोह व्हावा या उद्देशाने ही संमेलने भरवले जातात. तसेच साहित्याची आजच्या स्थितीत असलेली दशा व दिशा पडताळण्याचे कार्य होणे अपेक्षीत असते पण वास्तविकतेमध्ये सध्या त्याच्या एकदम विपरित चित्र पहावयास मिळत आहे. सरकारी तिजोरीवर डल्ला मारत जनतेच्या करोडो रुपयांतून साहित्य हितासाठी म्हणून भरवलेली ही साहित्य संमेलने अतिशय विरोधाभासी वाटत आहेत. कारण अशा साहित्य संमेलनांतून केवळ अध्यक्षपदाच्या निवडणूका लढवून दंडथोपटून आलेले संमेलनाचे अध्यक्षच या साहित्या संमेलनांचे आणि त्यांच्या मूळ उद्देशांचे चिथडे उडवताना दिसत आहेत.
उच्च विचारांचा आणि प्रदिर्घ मराठी साहित्याच्या सेवकाला मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद लाभने अपेक्षीत असते, परंतू विद्यमान परिस्थितीत याचे अतिशय विपरीत चित्र आहे. एकतर या पदासाठी सापेक्ष व्यक्तिच लाभत नसाव्या, असल्यातरी त्यांना राजकिय पार्श्वभूमी नसावी म्हणून असे साहित्यीक सापडत नसावे म्हणून या पदाची उपेक्षा होत असावी. आणि याउपर भेटले तरी फादर दिब्रिटोसारखे ज्यांना अनुवांशिक तर सोडाच पण प्रादेशिकत्वाने सुध्दा मराठी साहित्याचा गंध लाभलेला नसावा. कारण त्यांच्याकड असं काही असतं तर त्यांनी मराठीची साहित्याची एवढी उपेक्षा करणारे कर्तृव्य या साहित्य संमेलनातून दाखवलच नसतं. राज्यकर्त्यांकडून सुपारी घेऊन भाड्याचा पोपट बोलल्यासारख ते काल विषयसोडून बोलले म्हणून ही जनसामान्यांची भावना येथे व्यक्त होतेय.
दुसरीकडं मराठीची अवहेलना करणारी सर्वात मोठी बाब अशी की, मराठवाड्यासारख्या संतांच्या पावन भूमित घडवलेल्या साहित्य संमेलनात केवळ देखावा केला गोरोबा काकांचा पण त्यांच्या आणि अन्य संत साहित्याचा साधा उल्लेख सुध्दा येथे करण्यात आला नाही. यापुढं साहित्य समंलनांच्या आयोजकांना सुध्दा साहित्य संमेलनाची संहिता बनवून देण्याची गरज भासते की काय असं वाटायला लागलय. त्यामुळं तरी किमान साहित्य संमेलनांना दिशा मिळेल असं वाटायला लागलंय.
सध्याच्या माहितीतंत्रज्ञाच्या अतिरेकाने भरकटलेल्या युगात मराठीची काय आवस्था झालेली आहे. तिच्या संवर्धनासाठी काय काय करायला हवं. मराठी साहित्याकडे व शिक्षणाकडे मराठी माणसाने फिरवलेली पाठ सध्या मोठा चिंतनाचा विषय आहे, मराठी साहित्यात कॉपीपेस्टची वाढती संस्कृती, संपादन कौशल्यातून मागिल साहित्याची मोडतोड होऊन नव्याने हाळजील जाणारं संकरित साहित्य, नव्या पिढीची मराठीबद्दल निर्माण होत असलेली अनास्था, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या नावावर होणारी व्यक्ती परत्वे मार्केटिंग, मराठी विद्यापिठासाठी अनास्था असलेली राजकिय ईच्छाशक्ती अशा एक ना अनेक मराठी साहित्य सक्षमतेच्या विषयाकडे सपशेल दूर्लक्षकरुन आपली राजकिय भडास व्यक्त करण्यासाठीच होणारी साहित्य संमेलने खरोखरच मराठीच्या भविष्यासाठी खेदाची बाब आहे हेच अध्यक्ष फादर दिब्रिटो यांना सांगावस वाटतंय.
सध्यस्थितीत मराठी नावाने, मराठी माणसाचे कैवारी म्हणून मिरणारे राजकिय नेते यांनी स्वतःची मुलं त्यांच्या सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी विदेशात घालून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा जणू चंगच बांधला आहे. साधा नगरसेवक झालेला नेता सुध्दा आपल्या लेकराला विदेशात किंवा क्वॉन्वेंट स्कूलमध्ये घालून उच्चभ्रु दर्जा प्राप्त करण्याचा मागं लागला आहे. मग यांच्याकडून काय मराठीचं आणि मराठी साहित्याचं संवर्धन होणार आहे.
आहो मराठी म्हणजे आज भारतीय जनतेप्रमाणेच झालेली दिसून येतेय. म्हणजे निवडणूकी पूर्वी जनहित दाखवून निवडणूका जिंकायच्या, तसं मराठीच्या संवर्धनासाठी मराठी साहित्य संमेलनाची गरज निर्माण करायची, निवडणूकीत मतदार राजा तसं संमेलनापूर्वी मराठी मातृभाषा, मतदानानंतर मतदार सोडून राजकारण, तसं साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरुन राजकिय मतप्रकटीकरण आणि नंतर राजकिय लाळघोटी पणा करुन स्वार्थ साध्य करण्याचे जणू माध्यमच ही साहित्य संमेलने झालेत की काय असं वरचेवर वाटायला लागलंय.