देवणी येथील शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यी वसतिगृह उद्घाटनाच्या प्रतिक्षेत....

 


देवणी/रणदिवे लक्ष्मण :- देवणी तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी वास्तू म्हणजे नूतन मागासवर्गीय वसतिगृह होय.
आता तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यां करीता सर्व सोययूक्त असे भव्य दिव्य वसतिगृह इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आले आहे.या वसतिगृहात सुमारे १०० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.या वसतिगृहात विद्यार्थी राहण्याकरीता २५ रूम आहेत. एका रूम मध्ये ४ विद्यार्थी त्यारूम मधील प्रत्येक विद्यार्थीस एक पलंग, एक कपाट, एक टेबल त्या त्या रूमाला स्वच्छता गृह संलग्न राहणार आहे. हे वसतिगृह तीन मजली ईमारत आहे.तळ मजल्यावर स्वयंपाक व जेवणाचा हॉ ल तसेच कर्मचारांना राहण्याची सोय आहे.राहणार आहे. पहिल्या मजल्यावर व्यायाम शाळा सह ५० विद्यार्थी राहण्याचे सोय आहे. तर दुसरा मजल्यावर ५० विद्यार्थी वाचनालय सोय करण्यात आली आहे.पालक विद्यार्थीना भेटण्यासाठी आल्यावर त्यांना तळ मजल्यावर राहण्याची सोय करण्यात आले आहे.या भव्य दिव्य इमारतीचे उध्दघाटन केव्हा होणार याची प्रतिक्षा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागली आहे.