पर्यावरणाचा जागर राज्यस्तरीय व्हावा-महापौर विक्रांत गोजमगुंडे


लातूर :- महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, इको फोक्स संस्था मुंबई, गरवारे कम्यूनिटी सेंटर औरंगाबाद आणि जनरंगकला अकादमी लातूरच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या मराठवाडा विभागीय स्तरावरील आंतरशालेय माध्यमिक शाळांच्या पर्यावरण एकांकिका नाट्यस्पर्धेचे उदद्याटन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शाहिर संतोष साळुंके, प्राचार्य डी.एन.वेंैद्रे, प्राचार्य गिरीष सहदेव, रंगकर्मी संजय आयाचित, परेश पिंपळे, सुनिल सुतवणे, रमाकांत रऊतले, धोंडीराम भिंगोले, संयोजक दिपरत्न निलंगेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पर्यावरण जागृती ही काळाची गरज आहे. मागील १४ वर्षांपासून सुरु असणारी ही स्पर्धा म्हणजे पर्यावरण जागृतीची एक चळवळ आहे. ही चळवळ मराठवाडास्तरावर सुरु असतानाच अशा पध्दतीची मोठी चळवळ महाराष्ट्र स्तरावर निर्माण झाली पाहिजे यासाठी संयोजन समितीने पुढाकार घ्यावा. पर्यावरणाच्या राज्यस्तरीय एकांकिका नाट्यस्पर्धा लातूरात आयोजीत केल्यास लातूर महानगर पालिका योग्य ते सहकार्य करेल असे अश्वासन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिले.
या स्पर्धेमध्ये मराठवाडा विभागातील १३ संघांनी सहभाग नोंदवत पर्यावरणाचा जागर घातला. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत संयोजक दिपरत्न निलंगेकर, अभय मिरजकर, रत्नाकर निलंगेकर, युवराज कांबळे, श्रीकांत मांडवकर, नितीन मोगले, सुर्यकांत शिंदे यांनी केले. प्रास्ताविक दिपरत्न निलंगेकर यांनी केले. इकोफोक्स संस्थेचे संचालक परेश पिंपळे, गरवारे कम्यूनिटीसेंटरचे संचालक सुनिल सुतवणे यांनी स्पर्धेची संकल्पना मांडली. लातूर येथे मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला.