गांधीजी ..
हेमंत मुसरीफ पुणे 

 

बापूजी आपणावर

प्रेम आमचे अलोट

चित्र छापलेआपले 

म्हणूनि आवडे नोट

 

आपले नाव घेऊनि

अजूनि मागतो वोट

योजनेला नाव तुझे

आमचे  भरते  पोट

 

दंगलही तुझ्या नावे

नरडीचा घेतो  घोट

राहतो नामा निराळे

बंदोबस्त  कडेकोट