सत्ता आणि सत्य ह्या आजच्या भारतात जणू दोन किणार्याच्याच बाजू झालेल्या आहेत. वास्तविक पाहता सत्तेत येताना सत्याचा कांगावा करत असणारे पक्ष, संघटना आणि व्यक्ति या निव्वळ ढोंगीच असल्याचं जनतेलाही आजकाल कळायला लागलय. तरी परंतू मागच्या पेक्षा हा बरा या भावनेतून नाकमुरडून कधी याला कधी त्याला असा पसंतीक्रम जनतेकडून आजच्या घडीला तरी दिला जाताना पहायला मिळतय. राजकारणाबद्दत आज 101% वास्तविकता अशी झालेली आहे की, तुम्ही कुठल्याही मुद्यावर किंवा घटनेवरुन राजकाणात स्टार होता आणि मग आपला स्वार्थ आणि समाजविघातक उद्देश साध्य करुन सामाजिक तेढ निर्माण करण्यात किती यशस्वी होता तेवढे तुम्ही प्रभावी राजनेता म्हणून उदयास येता. अशा नेत्याच्या मागे मग अनेक चांगले चांगले (कागदोपत्री आपली निती, नियम आणि आदर्श बाळगणारे) पक्ष तुमच्या रितसर पक्ष प्रवेशासाठी लाईन लावतात. मागच्या काही दिवसांपूर्वी अनिल कपूरच्या भूमिेकेत साकारलेला नायक हा चित्रपट खुप मोठ्या वास्तवास प्रकट करुन गेला. यामध्ये खर्या खुर्या निर्ढावलेल्या खलनायकी नेत्याचे अस्तित्व ही प्रदर्शित केलं गेलय, तर त्याच प्रभावी पणे काल्पनिक नायकाची मांडणी केली गेलीय. आता वास्तविक खलनायक आणि काल्पनिक नायक म्हणण्याचं धाडस एवढ्याचसाठी करु शकतो की सध्या ते तंतोतंत अस्तित्वात आहे. राजकारण्या घाणरेड्या वृत्ती आणि नितीभ्रष्टतेबद्दल बोलाव तेवढं थोडं आहे. आहो साध्या गल्ली बोळातील एखाद्या संघटनेचा अध्यक्ष शिक्षीत असो वा नसे पण दोन चार वर्षांत अतिशय अलिशान वा लग्झरी चारचाकी वाहनातून फिरताना दिसतोय. त्या ऊलट उच्च शिक्षीत परंतू इभ्रतीला भिऊन राहणारा एखादा सज्जन व्यक्ति आपले आख्खे आयुष्य घालवून सुध्दा नितीमत्तेने व प्रामाणिकपणे कमाई करुन आपल्या सायकलची जास्तीत जास्त दुचाकी करु शकतो बास. त्यामुळे येणार्या काळात सत्य हे आज अस्तित्वात असलेल्या पोथी पुराणापुरतेच अस्तित्वात राहून ते कल्पना करण्यापुरतेच मर्यादित राहते की काय याची भिती वाटने सहाजिक आहे. भारताच्या स्वातंत्र्या नंतर काही काळ हा, देशाप्रती त्याग, देशप्रेम, सोज्वळ आणि निष्प्रभ सत्ताकारण आणि प्रामाणिक राजकारण घडलेही असेल. लाल बहादुर शास्त्री सारखे काही बोटावर मोजण्या इतके त्यागी देशभक्त, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी करुन स्वातंत्र्या मिळवलेल्या परिस्थितीची जाणीव असणारी काही मंडळी त्याकाळी अस्तित्वात होती हे मान्य आहे. पण 80 च्या दशकानंतर किंवा काही प्रमाणात त्याच्या अगोदरही म्हणता येईल भारतीय राजकारणाला भ्रष्टाचाराचे भिरुड लागले. आणि आजच्या घडीला कोणताही पक्ष आम्ही निःपक्ष, आम्ही निर्मळ, आम्ही प्रामाणिक म्हणवून घेत असेल तर तो केवळ विरोधकांना चिमटे काढण्याच्या उद्देशानेच. म्हणजे आम्ही तुमच्या पेक्षा कमी खाल्ले आणि तुम्ही मात्र...? या भावनेतून एकमेकांशी भ्रष्टाचारात चढाओढ करण्यात व्यस्त असताना पहायला मिळतेय. त्यांचंही काही चुकतच नाही म्हणा कारण आज देशातील निवडणूका ही स्वस्ताच्या राहिलेल्या नाहित कारण या निवडणूकांत राबणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, अगदी झेंडा घेऊन मोर्चात सहभागी होणारापासून निवडणूकांतील सभेच्या आयोजक, नियोजकांपर्यंत प्रत्येकजण नेत्या पुढार्यांकडून पेटयांच्या अपेक्षेत असतो तर शेवटी त्यांना निवडूण देणारा मतदार राजाही नोटासाठी हापापलेला असतो. एकूणच काय तर ही नवी रुढ झालेली व्यवस्था कोणी अस्तित्वा आणली त्यांची खानदाने ही अशीच वृध्दींगत झालेली असावीत. म्हणजे त्यांच्या खानदानाची उपज करण्यासाठी त्यांच्या जन्मदात्यांनीही असेच अनितीचे मार्ग अवलंबीलेले असावेत अशी घृणास्पद वक्तव्य व्यक्त करावीशी वाटतात. रामराज्याच्या नावाने प्रचार करणारी राज्यकर्ती मंडळी निवडणूकां दरम्यान कोट्यवधी रुपयांची उधळण करुन नंतर अगदी खोर्याने पैसे ओढण्यासाठीच निवडणूका जिंकण्याचा अटहास करतात.
राजकारणात जनतेची दिशाभूल ही गौण बाब झाल्याचं मागच्या अनेक निवडणूकांमध्ये अनुभवायला मिळालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या आदर्शवत राज्यघटनेचा त्यांचे अनुयायी पदोपदी अपमान करताना पहावयास मिळते. याउपर असे कोणी निदर्शनास आणून दिल्यास त्याच्याच विरोधात कटकारस्थान करुन त्याला निस्तेनाबूत करण्यासाठी अॅस्ट्रॉसिटीच्या कायद्याचा दूरउपयोग करुन मुठभर राज्यकर्त्यांना त्याचा लाभ घडवून देतात. एकीकडे त्यांच्या आदर्शांचे पोवाडे गातील पण दुसरीकडे सपसेल बाबासाहेबांच्या धम्माचा, त्यांच्या आचार विचारांचे धिंडवडे काढत लोकांकडून खंडण्यांच्या स्वरुपात तसेच राजकिय नेत्यांच्या बगलेत बसून बाबासाहेबांनी निर्माण करुन दिलेल्या स्वाभिमानाला त्या नेत्याच्या चरणी गहाण ठेऊन त्याची सेवा करतील. अशा असत्यवर्तनाला सत्तेचे पुजारी सध्या आदर्श वर्तनाचे किंवा आदर्श आचार संहितेची लेबल देत आहेत आणि आपला राजकिय स्वार्थ साधून उर्वरित मागासलेल्या समाजाला माणसिकदृष्ट्या आणखी मागासलेपणाकडे नेत आहेत हे वास्तव आहे. हे सर्व उमजत असताना सुध्दा काही सामाजिक वृत्ती किंवा त्यांचेच सामाजिक पुढारी या लोकांना त्यापासून परावृत्त होण्यासाठी सुध्दा आडथळे आणत आहेत हे ही तितकेच खरे आहे. कारण ह्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडणूकांच्या काळात हजार पाचशे रुपयांत येथील जनता मोर्चा, रैली, बैठका आणि सभांमध्ये गर्दी वाढवून शेवटी पैशावर मत देण्याच्या कार्यात सहभागी होतात. डॉ. बाबासाहेबांनी आदर्श निवडणूकीच्या आचारसंहितेच्या माध्यमातून जनसेवक हा मानधनावर पाच वर्षांसाठी जनतेतून निवडूण जावा या अपेक्षेने तरतूद केली होती. परंतू त्याची आज वास्तविकता पाहिली तर स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून अनेक भागातील नेते पूर्व परंपरेनुसार अनुवांशिक वारसा लाभल्यागत पुन्हा पुन्हा तेच किंवा त्यांचे वंशज निवडूण येतात. एव्हाणा घटनेनुसार ही पदे जरी आरक्षीत केलेली असली तरी त्या आरक्षणाचा कार्यकर्ता म्हणजे या नेत्याचा घरगडी म्हणूनच निवडूण येतो आणि त्यांच्या ईशार्यावर त्याच्या हयातीत कारभार हाकतो ही सध्याच्या सत्तेतील सत्यता आहे.