दिवसाढवळ्या घरफोडी करणारे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

 लातूर (प्रतिनिधी):-अंधश्रद्धेचा बळी पडून अनेकजण देव मागे लागला त्यामुळे आपले बरेवाईट होण्यास सुरूवात झालेली आहे.असा समज मनाशी बाळगून निराश झालेले नागरिक बाबाकडे जाऊन आपली कहाणी सांगत यावर उपाय काय आहे.असा प्रश्‍न उपस्थित करतात आणि बाबा त्यांना तुम्हाला म्हसोबा लागला किंवा गावाकडले भूत लागले हे काढण्यासाठी तुम्हाला अमुख अमुख करावे लागेल असा सल्ला बाबा देतात आणि नागरिक तो सल्ला ऐकत बाबंानी दिलेला उतारा करतच असतात.मात्र लातूर जिल्ह्यातील म्हसोबावाडी गावात म्हसोबा देवस्थान प्रसिद्ध असल्याने या गावचे नाव म्हसोबावाडी पूर्वजांनी ठेवलेले आहे.म्हासोबावाडी गावात नागरिकांचे संरक्षण म्हसोबाच करतो.हे गावकर्‍यांना माहित होते त्याप्रमाणेच गावात घटना घडली आहे.ते म्हणजे मागील काही दिवसापूर्वी भर दुपारी म्हसोबावाडी गावात चोरट्यांनी घरफोडी करून ३ लाख ३७ हजार रूपंयाचा ऐवज लंपास केलेला होता.याची पोलिसांत नोंद ही झाली मात्र चोरीचा तपास लागत नव्हता परंतु या चोरट्यांच्या मागे म्हसोबावाडीतीलच म्हसोबा लागल्यांने घरफोडी करणोर तीन अटल चोरटे काल सहजरित्या पोलिसांच्या जाळ्यात सापडलेले असल्यांने म्हसोबावाडीत चोरी करणार्‍या चोरट्याच्या मागे म्हसोबा लागल्यानेच चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अलगद साफडल्याची चर्ची मोठ्या चवीने चर्चीली जात आहे.
         याबाबत अधिक माहिती अशी की,१४ जानेवारी रोजी दुपारी साडेअकरा ते साडेचार वाजण्याच्या सुमारास म्हसोबावाडी, ता. निलंगा येथील प्रयागबाई एकनाथ हळदे या घराला कुलूप लावून शेताकडे गेल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख ९० हजार रूपये असा एकूण ३ लाख ३७ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव  व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोेजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कोमवाड, त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी संजय भोसले, योगेश गायकवाड, प्रमोद तरडे, हरूण लोहार, भीमाशंकर साखरे, राहुल सोनकांबळे, यशपाल कांबळे, रवी गोंदकर यांनी काल लातूर येथील बस्तापुरे नगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिरासमोर एका मोटारसायकलसह तिघेजन उभारल्याचे लक्षात आले. 
 याबाबत त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. या पथकाने यातील राजु कुंडलिक म्हेत्रे रा. शिवाजीनगर निलंगा यास पकडले. त्याची अंगझडती घेतली. त्याच्याजवळ सुमारे ४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले. याबाबत विचारणा केली असता त्याने आपण व गोपाळ हनमंत शिंदे रा. तळीखेड, ता. निलंगा, विशाल उर्फ भाऊजी नागनाथ कांबळे रा. संजयनगर लातूर या तिघांनी मिळून १४ जानेवारी रोजी निलंगा येथून म्हसोबावाडीस मोटारसायकलीने जाऊन हळदे यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम चोरल्याचे कबुल केले. 
 या तिघांनाही चोरीच्या काही ऐवजासह पोलीस पथकाने औराद शहाजानी पोलिसांच्या हवाली केले आहे. या तिघांकडून लातूर जिल्ह्यात व शेजारील जिल्ह्यात दिवसा घरफोड्या केल्याचे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या या पथकाने मोठ्या शिताफीने दिवसा घरफोडी करणार्या तिघा जणांना पकडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.