एन.आर.सी , सि.ए.ए. रद्ध करण्याचे राष्ट्रपतींना निवेदन.
अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथून एन.आर.सी, सी. ए. ए हा कायदा अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात असून त्वरित हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी सर्व समाजाच्या वतीने एकता मार्च रॅली काढण्यात आली हाडोळती शिरूर व्हाया मार्गे अहमदपूर असा एकूण १८ किलोमीटर प्रवास भव्य रॅली काढून हजारोच्या संख्येने कायद्याचा विरोध दर्शवून गावकऱ्यांच्या वतीने अहमदपूर तहसीलदार यांच्यामार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्तांत असा की सी. ए. ए व एन. आर. सी हा कायदा बहुजनांच्या विरोधात असून सदरील कायदा त्वरित रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हाडोळती व परिसरातील समस्त गावकरी यांच्यावतीने भव्य एकता मार्च रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तर सदरील रॅली ही हाडोळती शिरुर व्हाया मार्गे अहमदपूर अशी एकूण अठरा किलोमीटर पदयात्रा काढून कायदा वापस घेण्याच्या घोशणे सह एकता मार्च रॅली काढण्यात आली व अहमदपूर तहसीलदार मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
सबंध भारतभर एन. आर. सी व सी. ए. ए च्या विरोधात मोठ्याप्रमाणात आंदोलने होत असून आंदोलनात सर्व समाजातील अभ्यासू लोकांचा समावेश असून भारता व्यतिरिक्त इतरत्र ही कायद्याविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने होत असून सत्य हे सत्य असते व सत्यासोबत होणाऱ्या आंदोलनातील जन लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असून सदरील कायदा रद्द करण्यासाठी होत असलेल्या आंदोलनात लोकसंख्या जास्त दिसून येते तर केवळ भाजप नेत्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे असे भासविण्यासाठी अल्पशा संख्येत भाजप लोकांना घेऊन कायदा योग्य असल्याचे भासवीण्यात येत असुन हा कायदा मुस्लिम विरोधी असल्याचेही लोकांना पडवुन दिले जात आहे पण हा कायता बहुजन व अल्पसंख्याक यांच्या विरोधात आहे हे सत्य लपविले जात आहे सदरील कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी होत असलेले आंदोलने व त्यांची लोकसंख्या पाहता सत्याला नक्कीच विजय प्राप्त होईल व हा जाचक कायदा शासनाला रद्द करावे लागेल असे मत आंदोलन कर्ते यांच्यावतीने सिराजोद्धिन जहागीरदार यांनी आपले मत दै.देशोन्नती शी बोलताना व्यक्त केले.
एकता मार्च रॅलीत सिराजुद्दीन जागीरदार, शेख शादुल, फकीर अहमदसाब, पठाण सलमान, खुरेशी छोटू मिया, अरबाज पठाण, बागवान जावेद शेख, उत्तमराव जाधव, संजय जाधव, ज्ञानोबा जाधव, माधव जाधव, व्यंकट नाना, मुसा सय्यद, शेख फिरोज, सलीम शेख, माजिद शेख, उस्मान कुरेशी, मुजीब पठाण, शादुल शेख, साजिद शेख, असलम पठाण, काजी सर, राम मोळके, अभिनव पवार, सुभाष पवार, मोसिन मणियार, रफिक अहमद, बादल शेख, एमडी इरफान, नय्युम पठाण आदींसह एकता मार्च रॅलीत हजारो लोकांचा समावेश होता.