पशुधन हे चालते फिरते एटीएम - प्रा.डॉ.अनिल भिकाणे.
लातुर :  महाराष्ट्र नवनिर्मान सेना आयोजित कृषी प्रदर्शन'कृषी नवनिर्माण २०२०' तज्ञांचे मार्गदर्शन यात पशुसंवर्धन व दुग्ध विकास या विषयावर बोलतांना प्रा.डॉ.अनिल भिकाणे यांनी शेतकऱ्यांना पशु पालन करण्यासाठी प्रोत्साहित करत पशु धन हे चालते फिरते एटीएम असल्याचे उद्दगार काढले.

यावेळी मनसे नेते मनोज चव्हाण,शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे,मनसे सहकार सेनेचे दिलीप बापू धोत्रे,मनसे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष भागवत शिंदे आदि उपस्थित होते.

   पुढे बोलतांना म्हणाले कि, कृषीचा अविभाज्य घटक हा पशुधन आहे, त्यासाठी शेतीला म्हैस,गाय,बैल असने

गरजेचे .जनावरे हे केवळ आर्थिक बळ देत नाहीत तर ते शेतकऱ्याला जगण्याचेही बळ देतात. उत्पन्न वाढवयाचे असेल तर माती जगवावी लागेल आणि माती जगवायची असेल तर पशु जगवावे लागतील. शेंद्रीय खतच मातीतील जिवाणू जगवितात ज्यामुळे पिक चांगले येते.शेतकऱ्यांनी मुक्त गोठ्यांची संकल्पना राबवावी.जनावरांना दोन वेळेस चारा तर दिवसभर पाणी उपलब्ध ठेवावे.जन्मलेल्या वासराला एका तासाच्या आत चिक युक्त दुध पाजावे.यातुनच चांगल्या पशुची निर्मिती होते.

   सकाळच्या सत्रात झालेल्या सोयाबीन,तुर,हरभरा उत्पादन वाढ या सत्रा दरम्यान बोलताना प्रा.डॉ.वसंत सुर्यवंशी म्हणाले कि,जमिनीची पोत

कमी झाली असुन जमीनीला 

लागणाऱ्या सतरा अन्न द्रव्यापैकी केवळ सातचअन्न द्रव्य उरले असुन याची भरपाई करायची असेल जमिनीची पोत वाढवायची असेल तर शेतात जास्तीत शेन खताचा वापर करून पिकांना खाऊ न घालता जमिनीला पोषक आहार दया.पिकांवर मर रोग येवु 

नये म्हणुन वेळीच नियंत्रण

करणे.याकरिता रामबाण उपाय म्हणजे बेवड बदलने.

हरभऱ्याला फूलांच्या अवस्थेत पाणी देवु नये,

ठिबकने पाणी द्या,पहिल्या फूलांचा व शेवटच्या फुलामधील काळ जेवढा कमी असेल तेवढया लवकर तुर काढणीला येते एकच पीक पाच वर्ष सतत त्याच त्याच जमिनित घेतले तर मर 

रोगाचा प्रार्दुभाव वाढतो.

याकरिता बेवड बदलने व शेतात जास्तीत ज्यास्त शेण खत, गांडुळ खत व हिरवळीच्या खताचा वापर करावा म्हणजे उत्पन्नात अधिकाधिक वाढ होते. 

  शेती व जल व्यवस्थापन या विषयावर माजी कुलगुरू प्राचार्य डॉ.बापुजी अडकिने म्हणाले कि,लातुर जिल्ह्याचा 

विचार केला तर ६५०मि.मी. इतका पाऊस झाला परंतु त्याचे १८००मि.मी. बाष्पी भवन आहे म्हणजे जिल्यातील शेतकरी दुर्देवी म्हणावा लागेल.वर्षातील ३६५ दिवसापैकी १२० पावसाचे त्यापैकी ४५ दिवस पाऊस पडतो याही दिवसात निम्यापेक्षा पाऊस फक्त १५ तासच पडतो.जमिनीवर पडणारे ३०टक्के पाणी वाहून जाते,३०टक्के पाणी ओलाव्याच्या रूपात साठून राहते,२५टक्के वाफ होवुन जाते.उरलेले १५टक्के पाणी हे जमिनीत मुरते ही अवस्था पाण्याची आहे यामुळे पाण्याच्या उपलब्धते नुसार

पिकांची लागवड करणे गरजेचे आहे.कमी कमी पाण्यावर येणारी हरभरा, करडई,वेल फळांची लागवड करून त्यांना ठिबक ने पाणी 

देवुन जोपासावी.पावसाचे पाणी जमिनीत जास्तीत ज्यास्त जिरवावे,भुगर्भातील पाणी हे बँक डिपॉझिट असल्याचे म्हणाले.