उदगीर (बिराजदार बस्वराज ) : शहरामध्ये मागील काही महिण्यामध्ये पहाटेच्या वेळी महिलांच्या गळयातील गंठण व सोन्याचे दागीने जबरीने चोरीबाबत गुन्हयात वाढ झाल्याने मा.पोलीस अधीक्षक श्री.डॉ. राजेंद्र माने, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनिल नागरगोजे स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा एकामागोमाग गुन्हे उघडकीस आणणारे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड यांच्या पथकातील पोह. अंगद कोतवाड, पोना.राम गवारे, ईसुफ शेख, सदानंद योगी, पोकॉ.राजाभाऊ मस्के, चापोह. नागनाथ जांभळे, यांनी मिळून (दि. २४.०१.२०२०) रोजी स. ७.०० वाजल्या पासुन पो.स्टे उदगीर ग्रा. गुरनं.२२/२०२० कलम ३९२ भादंवि. गुन्हयातील आरोपी शोध कामी उदगीर शहरात पेट्रोलींग करीत असताना त्यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की उदगीर शहरातील पहाटेच्या वेळी मोटार सायकलवर येवुन गंठण व सोन्याचे दागीने जबरदस्तीने चोरी करणारा ईसम ओमप्रकाश याळे हा आहे.
त्यावरुन सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी उदगीर शहरामध्ये सदर आरोपीचा शोध घेत असताना गुप्त माहिती मिळाली की, सदर आरोपी नळेगांवकडून उदगीर कडे टोने येत आहे.
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी पो.स्टे. उदगीर ग्रामीण येथील पोउपनि. गायके, पोना. नामदेव सारोळे, चंद्रकात कलमे, नाना शिंदे, तुळशिरा बरुरे, राहुल गायकवाड, यांच्या मदतीने मौजे करडखेल पाटी येथे नाकाबंदी लावून वाहनाची तपासणी करीत असताना एक काळया रंगाचा टो नळेगांव कड्न उदगीर कडे जात असताना त्याला थांबवून त्याची तपासणी केली असता बातमीतील वर्णणाप्रमाणे सदर ईसम टो मध्ये संशयीत रित्या मिळून आल्याने सदर इसमास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव ओमप्रकाश तुळशिदास याळे, वय २५ वर्ष, रा. पंढरपुर ता. देवणी जि.लातूर असे सांगीतले.