‘राज‘चा ट्रम्पना बालिश विरोध

सध्या महाराष्ट्रातील सत्तांतरा नंतर राज्यात अनेक फेर बदल होण्याची अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात असून याच संधीचा फायदा घेत संधीसाधूवृत्तीच्या मनसेने आपलाही मनसेपॅटर्न, धोरणे आणि तत्व यांमध्ये अमूलार्ग बदल केलाय. हिंदूत्वाच्या धोरणावर स्थापन झालेल्या मनसेने शिवसेनेचीच शाखा समजल्या जाणार्‍या मनसेचे आता मनसुबे कालपरत्वे बदलू शकतात ही सिध्द करुन दाखवलंय. संपूर्ण देशात सध्या दिल्ली विधानसभेच्या निवडणूकांनंतर अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आपल्या धोरणात आणखी बदल केलेला जाणवतोय. तो असा की सर्व धर्म समभावाच्या तत्वावर स्थापनेला फाटा देत आता यांनीही हिंदूत्वाचीच कास धरत केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदूत्वाला पुन्हा पुनःरुजीवीत करण्याचा केविलवाना प्रयत्न केल्याचे आपणास पहावयास मिळत आहे. कारण त्यांनी नुकतेच शिवसेनेच्या हिंदूत्वाच्या बरगाड्या उघड्या पाडून डाव्यांशी हातमिळवणी करुन आपले खूर्ची स्वार्थाचे राजकारण करणार्‍या शिवसेनेचा महाराष्ट्रातील होणार्‍या मानहानीचा फायदा घेऊन शिवसेनेच्या जागी आपली प्रभावी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून केला जात असल्याचं सगळ्या महाराष्ट्राकडून कौतुक केलं जात आहे. याच उत्साहाच्या भरात राज ठाकरे यांनी काही ठिकाणी राज्य सरकारचा, काही ठिकाणी केंद्र सरकारचा विरोध करुन आपला अनोखा नवा पायंडा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यात वावग वाटण्यासारखं काही नाही कारण त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण आहे. हे करत असताना त्यांना कदाचित आपल्या राजकिय अस्तित्वाची जाणीव किंवा वैचारिक परिसिमांची जाण निव्वळच नसावी असे प्रदर्शन त्यांनी नुकतेच भारतभेटीवर येणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतात येण्याला विरोध करुन केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारतभेटीवर येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीपासून दोन दिवसीय भारत दौर्‍यावर असणार आहेत. यावेळी ते दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प येणार असल्याने अहमदाबादमध्ये सध्या जोरदार तयारी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला ‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ असं नाव देण्यात आलं आहे. मनसेने कार्यक्रमाच्या नावावर आक्षेप घेतला असून केम छो’ का ? अशी विचारणा केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष 24 फेब्रुवारीला अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद ! आणि त्या कार्यक्रमाचं म्हणे नाव असणार आहे केम छो मिस्टर प्रेसिडेंट?.. केम छो?.. केम छो का?. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यामुळे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास भारत आणि अमेरिकेने व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ट्रम्प भारतभेटीवर येत असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण झाल्यानंतर ट्रम्प यांच्या भारत दौर्‍याची घोषणा करण्यात आली. या दौर्‍यात ट्रम्प हे दिल्ली आणि अहमदाबादला भेट देऊन तेथील अधिकृत कार्यक्रमांत सहभागी होणार असून, विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी संवाद साधणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलेनिया याही भारत दौर्‍यावर येणार असल्याचे व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव स्टेफनी ग्रीशम यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमासाठी दुपारची वेळ निश्चित करण्यात आली आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडिअममध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात जवळपास एक लाख लोक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी अनेक विद्यार्थी, व्यवसायिक, अनिवासी भारतीयांना निमंत्रित करण्यात आल आहे. ट्रम्प तेथून साबरमती आश्रमला जाणार आहेत. सप्टेंबर 2019 मध्ये अमेरिका दौर्‍यात नरेंद्र मोदींचा ह्युस्टन येथे हाऊडी मोदी कार्यक्रम पार पडला होता. त्याच धर्तीवर केम छो मिस्टर प्रेसिडेंट’ असं नाव कार्यक्रमाला देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. एकूणच काय तर राज्यस्तरावरच्या असणार्‍या या राजकिय पक्षानं अगदी जगात महासत्ता असलेल्या आणि त्यातल्या त्यात भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीला विरोध करुन राज ठाकरे आपल्याला व आपल्या पक्षाला चर्चेत ठेवण्याचा केविलवाना प्रयत्न करत असावेत अशी चर्चा केली जात आहे. राज ठाकरेंच्या एकूणच राजकिय हालचालींना कोणत्या दिशा मिळली आहे किंवा मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. राज ठाकरेंच्या अतिउत्साही पणाचा त्यांना त्यांच्या राजकिय जिवनात अनेक वेळा त्रास सहन करावा लागला असला तरी त्यांचा तो आक्रमक बाणा त्यांनी कधीच सोडला नाही मग भलेही त्याचे परिणात सकारात्मक असतील किंवा नकारात्मक ते नेहमी होणार्‍या परिणामांना आनंदान सामोरे जातात हे ही तितकेच खरे. त्यामुळ पक्ष उभारणीनंतर महाराष्ट्रातील अनेक जागांवर त्यांना अपेक्षीत जागाही मिळाल्या होत्या परंतू त्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना केवळ मनोरंजनाच साधनच म्हणून वापरलं कि काय असा अनेक वेळा अनुभव ही आला असतील तरी त्याचे परिणाम भोगून सुध्दा ते शिवसेनेच्या विनाशकालामध्ये स्वतःच्या पक्ष बांधणीची संधी साधणार का हा येणारा काळ ठरवेल हे मात्र नक्की.