व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करण्यासाठी तरुणाई सज्ज


प्रेमाचे फुलपाखरु, स्वच्छंद उडतं, 
मनमोही रंगानी, पुरतं वेडं करतं...


लातूर (महेश चेंगटे) ः प्रेम, प्यार, प्रीती, मोहब्बत, इश्क, आशिकी, दिल्लगी... शब्द वेगवेगळे; पण भावना समानच. ती भावना, प्रेमाचे नातं हृदयात जपायचं, अगदी जिवापाड... हेच नाते स्टार्टअप करणे, दृढ करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे प्रेम मागुन मिळत नाही, प्रेम वाटवं लागतं, ध्यानी मनी नसताना, अवचित भेटावं लागतं..., माझ्यावर प्रेम करा, असं म्हणता येत नाही, करू म्हटल्याने, असं काही होत नाही..., त्यासाठी जुळाव लागतात, उभयंताचे धागे, भीड आणि भीती मग, आपो आप पडते मागे..., प्रेमाचे फुलपाखरु, स्वच्छंद उडतं, मनमोही रंगानी, पुरतं वेड करतं..., पण त्यामागे धावलं तर, आणखी पुढे पळतं, डोळे मिटून शांत बसलं, की हळूच खांध्यावर बसतं... आज व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करण्यासाठी तरुणाईसह तरुण मनेङ्घ सज्ज झाली आहेत.
 तरुणाई म्हंटल की, प्रेम हा दोन अक्षरी शब्द आलाच या शब्दात किती शक्ती आहे, हे प्रेम केल्यावरच कळतं आज प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलंटायन्स डे आज तरुणाई आपल्या प्रेमासाठी एक मेकांना आलींगन घालून जन्मभर तुझीच साथ राहो म्हणून कोणतीतरी भेट वस्तू आपल्या प्रेयकराला किंवा प्रेयसीला देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. महाविद्यालयाच्या कट्टयावर आज व्हॅलंटाईन डे साजरा करण्यासाठी तरूणाई फुलून गेलेली असते. आपल्या प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी आपला प्रेयकर किंवा प्रेयसी वाट पाहत बसलेली असते. तो पुढे आला तर शब्दाची जुडवाजुडव कशी करायची याची तयारीही प्रेमीकांनी अधिच केलेली असते. ज्याच्या त्याच्या परीने जे करता येते ते त्यांनी अधिच करून ठेवलेले असते. परंतू प्रेम फक्त व्यक्त करून होकार मिळवण्यापेक्षा ते अव्यक्तच राहिले तर त्याची मजा वेगळीच असते, आणि त्यातही प्रेम आहे किंवा नाही, हे सांगायची आता गरत राहिलेली नाही. त्याच्या किंवा तिच्या डोळ्यातून दिसताक्षणी ओतंबून वाहत असते. त्यामुळे प्रेम ओळखणे सहजच सोपे जाते.
 तरुणाईने आपल्या वागण्यातून, बालण्यातून, सहकार्यातून आणि एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी झाले तर एकमेकांचे प्रेम चिरकाल टिकते. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे तरुणाई सांगत असते परंतू यामध्ये फारसा गोडवा नसतो या प्रेम या शब्दातून ओलावा आटून गेलेला असतो. ज्या नात्यामध्ये ओलावा नसतो ते नाते बुडबुड्याप्रमाणेच म्हणावे लागेल असे येणारे बुडबुडे आपोआपच काही क्षणात फुटतात, अशा प्रकारेच आपलेही प्रेमाचे होऊ नये. यासाठी तरुणाईने काळजी घेतली पाहिजे. तरुण तरुणाई मध्ये आपल्या आयुष्यातील काही ठराविक वयामध्येच प्रेमाची भावना उत्पन्न होते. हा काळ तसा म्हणावा तर आपल्या आयुष्याला कलाटणी देणाराचं असतो. या काळातच तरुणाईने योग्य दिशेने पाऊल टाकले पाहीजेत. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम हा शब्द कोणत्या ना कोणत्या नात्याने येतच असतो. प्रेम करणे हा गुन्हा नाही पणं प्रेमाच्या नावाखाली एखाद्याचे मन दुखवून त्याच्या आयुष्यात कधीच डोकाऊ नये. त्यावर अवलंबून राहू नये आणि आपल्या भावनांवर आवर घातली पाहीजे. आपल्या प्रेमामुळे केवळ दुसर्‍यांना सुख चं मिळाले पाहीजे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्यांच्यापुढे दुःखाचा डोंगर उभा करु नये, किंवा आपण तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी काटा ठरत असेल तर आपण होऊन यातून मार्ग काढला पाहीजे. कोणाच्याही आयुष्यात आपल्यामुळे वाईटपणा येऊ नये याची दक्षता आजचया तरुणाईने घेतली पाहीजे. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आजच्या व्हॅलंटाईन डे दिवशी एकमेकांना गुलाबाची फुले देण्याची किंवा माझे तुझ्यावर प्रेम आहे असे आपल्या प्रेयसीला किंवा प्रेयकराला जाणवून द्यायची गरज नाही, फक्त एकमेकांनी एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन दुःख जाणून घेतले तर खर्‍या अर्थाने प्रेम या शब्दाचा अर्थ सार्थ होईल.