लातूर (प्रतिनिधी):-शिक्षणाची पंढरी म्हणून लातूरचा दबदबा संपूर्ण राज्यभर राहिलेला आहे.त्यामुळे लातूरच्या शैक्षणिक संकुलणाला लातूर पॅटर्न म्हणून ओळखले जाते.या लातूर पॅटर्नत अनेक अधिकारी घडवलेले आहेत आणि आताही घडतच आहेत.लातूर पॅटर्नमध्ये संपूर्ण राज्यभरामधून शिक्षणासाठी मोठी विद्यार्थ्यांची गर्दी असते.तसे १० वी व १२ वी परिक्षेत भरारी पथकाची बोर्डाच्या वतीने नेमणूक केली जाते.त्याचप्रमाणे आता महाविद्यालयात घेण्यात येणार्या प्रात्यक्षिक परिक्षेतही भरारी पथक प्रत्येक महाविद्यालयात धडकणार असल्याने लातूर पॅटर्न मधील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांचेही धाबे दणादणलेले दिसून येत आहेत.यातच संस्था चालकाची मात्र चांगलीच भाबेरी उडून संस्थाचालकाची धावपळ सुरू झाली आहे.
महाराष्ट्रासह देशविदेशातूही विद्यार्थी लातूर शहरात शिक्षणासाठी येत असतात याचे कारण म्हणजे मागील अनेक वर्ष लातूरच्या शिक्षण संकूलणामध्ये देण्यात येणार्या शिक्षणामुळे विद्यार्थी चांगला घडून तो चांगल्या पदावर जात आहे.त्यामुळे लातूर पॅटर्नचा दबदबा संपूर्ण राज्यभर सततच गाजत असतो.१० वी व १२ वी च्या बोर्डाच्या वतीने घेण्यात येणार्या परिक्षेत महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळ चोख बंदोबस्त ठेवतो त्यामुळे लातूर पॅटर्नमध्ये विद्यार्थीमध्ये परिक्षेत कॉपी प्रकार क्वचितच कुठेतरी आढळून येतो याचे कारण म्हणजे परिक्षा मंडळाने परिक्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात भरारी पथकाची नेमणूक केलेली असते.त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी करून पास होणे शक्यच होत नाही.विद्यार्थ्यांने अभ्यास करूणच पास व्हावे लागते.या कारणामुळेच लातूर पॅटर्नचा दबदबा वाढलेला आहे.यातच बोर्डाच्या परिक्षामंडळाने पॅक्टिकल सुरू अतानासुद्धा भरारी पथक नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे.
१० वी व १२ वी च्या बोर्डाच्याप्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथकाच्या निगराणीतप्रॅक्टिकल परीक्षांना दुय्यम महत्व दिले जाते. काही शाळांमध्ये तर प्रयोगशाळाही नाहीत. ही परीक्षा कागदोपत्रावर आटोपून विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जातात. त्यामुळे मात्र, विद्यार्थ्यांची गुणवत्ता घटत आहे. शाळा किंवा महाविद्यालयातील शिक्षकच या प्रॅक्टिकल गुण देतात. हीच बाब लातूर बोर्डाच्या निदर्शनास आल्यामुळे यंदापासून नवा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरील परीक्षकासोबतच भरारी पथकाचीही करडी नजर या परीक्षांवर राहणार आहे. १७ फेब्रुवारीपासून इयत्ता १२ विच्या प्रॅक्टिकल परीक्षा होत आहेत. या परीक्षांदरम्यान ही भरारी पथके नेमण्यात येणार असल्याचे पात्र बोर्डाचे सचिव यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना दिले आहे. त्यामुळे आता मुख्य परीक्षेबरोबरच प्रॅक्टिकल परीक्षेतही विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे बाह्य परीक्षकाला हाताशी धरून पार पाडली जाणारी प्रॅक्टिकल परीक्षा आता भरारी पथकाच्या निगराणीत होणार आहे.शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्नचे वेगळे महत्व आहे. असे असतानाही प्रात्यक्षिक परीक्षेकडे कायम दुर्लक्षच झाले आहे. या परीक्षेचे गुण हे ग्राह्यच धरले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाल्याने लातूर बोर्डाने यंदा होणार्या प्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयाचे धाबे दणाणले आहेत.
लातूर पॅटर्नच्या प्रात्यक्षिक परिक्षेतही घुसणार आता भरारी पथक