सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल

लातूर कपडा बँकेचा संत कबीर प्रतिष्ठानकडून गौरव

लातूर, दि. 08 ः लातूर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातूर व संत कबीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कबीर व्याख्यानमाला - 2020 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणार्‍या संस्था व व्यक्तिंचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये लातूर येथील लातूर कपडा बँकेचा संत कबीर प्रतिष्ठानकडून गौरव करण्यात आला.
लातूर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लातूर व संत कबीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 12 वे पुष्प गुंफण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यान मालेचे प्रमुख व्याख्याते म्हणून ह.भ.प. शामसुंदर सोन्नर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. अंबादास देशमुख सर, अ‍ॅड्. मनोहरराव गोमारे, माधव बावगे, प्रा.डॉ.दिलीप गुंजरगे आदींचर व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
लातूर कपडा बँक हि संस्था गेल्या चार वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. या संस्थेने मागल चार वर्षांत दोन लाखांपेक्षा अधिक गरजूंना कपडे वितरीत केले आहेत. तसेच त्यांच्याकडून अन्य अनेक सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील दूर्बल घटकांना आधार देण्याचे कार्य घडलेले आहे. मग यामध्ये हिवाळ्यात रोडच्या दुभाजकावर झोपणारे निर्वासीत किंवा बसस्टँण्डवर पडलेले भिखारी यांना उबदार कपडे देणे, लहान मुलांना शाळेचा गणवेश देणे आदी कार्य त्यांच्याकडून केले होते. याच कार्याबद्दल लातूर कपडा बँकेचे सचिव सुनिलकुमार डोपे व कोषाध्यक्ष  रामदास काळे यांचे शाल, श्रीफळ, बुके व सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात दै. पुण्यनगरी या वृत्तपत्राचे उपसंपादक संतोष शिंदे यांचाही यथोचित गौरव करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना लातूर कपडा बँकेचे सचिव सुनिलकुमार डोपे यांनी लातूर कपडा बँकेची सर्व माहिती सांगुन या सामाजिक चळवळीत आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच संत कबीर प्रतिष्ठान,लातूर यांच्या 12 वर्षे अखंड चालू असलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सत्कारासाठी लातूर कपडा बँकेची निवड करण्यात आल्यामुळे आभार मानले. यावेळी ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नर यांनी संत साहित्यातील संविधानाचे मूल्य या विषयावर विचार प्रकट करून उभयतांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. रणजित जाधव यांनी, सूत्रसंचालन प्रा. राजेश विभुते यांनी तर आभारप्रदर्शन अनिल दरेकर  यांनी मांडले.