देवणी/प्रतिनिधी :- विविध कार्यकारी सेवा सोसायटी भोपणी अंतर्गत रसिका वेअर हाऊस देवणी येथे सुरू करण्यात आलेल्या नाफेड तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन जिल्हा फेडरेशन जिल्हाधिकारी श्री. लटपटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मा.श्री. सुरेश घोळवे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक निबंधक श्री. चाटे साहेब यांची उपस्थिती होती. तसेच पोलीस निरीक्षक श्री चितांबर कामटेवाड मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब, मा. श्री. यशवंतराव पाटील, मा. श्री.अनंत पाटील टाकळीकर, मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब, श्री. म्हेत्रे बाबुराव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मा. श्री. गोविंदराव भोपणीकर साहेब, मा. श्री.अनंत पाटील टाकळीकर, मा. श्री. यशवंतराव पाटील, श्री लटपटे साहेब, श्री. चाटे साहेब यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब यांनी शेतकऱ्यांनी व्यापारी दृष्टिकोनातून शेती केली तर शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती होऊ शकते.सर्वांनी सहकाराच्या माध्यमातून सामूहिकपणे प्रयत्न केले तर शेतकरी यशस्वी होऊ शकतो. यासाठी आपण शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा फेडरेशन जिल्हाधिकारी श्री.लटपटे साहेब यांनी शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवित आहे तूर खरेदी केंद्र हे उपयुक्त माध्यम आहे त्यासाठी या नाफेड तूर खरेदी केंद्राचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात तहसीलदार मा. श्री. सुरेश घोळवे यांनी शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीतील कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करणे व विविध व्यवसायात पदार्पण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. शेतकर्यांनी पीक पद्धती विकसित करावी. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास लक्ष्मणराव दोडके, श्री.प्रभू इंगोले, बसवराज स्वामी, दाऊदभाई उंटवाले अमर मुर्के, गोरख अंजुरे, मालबा घोणसे, अविनाश दोडके, प्रदीप पाटील, रतन गरड यांच्यासह देवणी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.