रूग्नालयात पोहचले लातूर बोर्डाचे सचिव
गंगाच्या अपघाताची घटनाची बातमी लातूरच्या बोर्डास मिळताच बोर्डाचे सचिवाने तातडीने रूग्नालयात भेट देवून गंगाची चौकशी केली व ति जर परिक्षा देण्यास सक्षम असेल तर रूग्णालयात तिला पेपर देण्याची व्यवस्था केली जाईल असे सांगितले मात्र संबंधीत डॉक्टर आणि गंगाने मी ही परिक्षा देवून शकत नाही असे सांगितल्याने गंगा आज इंग्रजीच्या पेपरला मुकलीच आहे.
लातूर/प्रतिनिधी : बारावीची परिक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयूष्यातील टर्निग पांइट ठराणारी परिक्षा असते यावरूनच विद्यार्थ्यांचे आयुष्य कोणत्या वळणार जाणार हे ठरणार असते.यासाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर जिवाचे राण करून अभ्यास केलेला असतो यातच ऐन परिक्षेच्या वेळीच विद्यार्थ्यावर एखादे संकंट आले तर त्यांच्या मनाची काय अवस्था होते याबाबत न बोललेच बरे असाच प्रकार आज बारावीची परिक्षा सुरू होण्यापूर्वीच सकाळी लातूर शहरात घडली.परिक्षेची घंटा वाजताच गंगा नावाची विद्यार्थींनी एका वाहनाला धडकली आणि तिचा अपघात झाला.विद्यार्थ्यांनी परिक्षा दयाला सुरूवात केली आणि गंगावर रूग्णालयात उपचार सुरू केले.ऐकीकडे गंगाला जखमी झाल्याच्या वेदना सोसत नव्ह्त्या तर दुसरीकडे परिक्षा न देता येत नसल्याने आपण परिक्षेला मुखलो आणि वर्षभराची मेहनत वाया गेली यामुळे ती परिक्षाबाबतच्या वेदना कोणाला सांगू ही शकत नव्हती परंतु नाविलाजाने दुसरे विद्यार्थी परिक्षा देत असताना तिच्यावर मात्र रूग्णालयात उपचार सुरू असल्याने ती कळवळत होती.
दरम्यान आज विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस म्हणजे बारावीच्या परिक्षेचा दिवस होता.आज इंग्रजीचा पहिला दिवस असल्याने सर्वच विद्यार्थी वर्षभर अभ्यास करून परिक्षेला समोर गेले.मात्र याच परिक्षेसाठी शहरातील गंगा सेन नावाची विद्यार्थींनी शहरातील दयानंद महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत होती ही एमआयडीसी परिसरात वास्तव्यास आहे.आज बारावीचा पहिला पेपर असल्याने ती आपल्या मैत्रीनीसोबत सरस्वती कॉलनीतील शिवाजी विद्यालयात परिक्षेसाठी सकाळी दुचाकीवरून येत असताना ५ नं चौकात ऐका वाहनाला ती धडकली इकडे परिक्षा सुरू होण्याची घंटा वाजली आणि तिकडे अपघाताची घटना झाली.या अपघातात गंगाच्या पायाला आणि डोक्याला मार लागला असून ती परिक्षा केंद्रापर्यंत पोहचू शहली नाही सरळ तिला खाजगी रूग्नालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.