(उदय गुंडीले ): अहमदपूर आगारातील वाहक व चालकाची मोफत नेत्र तपासणी शिबीर मराठी पत्रकार संघाच्या वतीने व शिवलिंग शिवाचार्य दृष्टी केंद्र च्या वतीने आयोजित करण्यात आला होता या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन जिल्हा वाहतूक नियंत्रण अधिकारी अभय देशमुख होते तर अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव देशमुख होते प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सुनील पुजारी उपसभापती पंचायत समितीचे उपसभापती बालाजी गुट्टे आगार प्रमुख बिराजदार होते या नेत्रतपासणी शिबिरात 126 चालक व वाहक यांची मोफत नेत्र तपासणी लायन्स नेत्रालय उदगीर व डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज दृष्टी केंद्र अहमदपूरच्या वतीने करण्यात आली यावेळी बोलताना जिल्हा वाहतूक नियंत्रक यांनी लातूर जिल्हा हा अपघात सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर असून दर दहा लाख किलोमीटरला केवळ एक अपघात होत असतो त्यामुळे लातूर विभागाचे नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव लोकगीत झालेला आहे तसेच प्रत्येक चालकांनी डोळ्या बाबतीत तंदुरुस्त राहणे गरजेचे असून त्यामुळे त्यांची दरवर्षी नेत्र तपासणी केली जाते या वर्षीही पत्रकार संघाने केलेल्या उपक्रमाचे ही त्यांनी कौतुक केले तसेच अहमदपूर आरास आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले अध्यक्ष भाषणात दिलीपराव देशमुख यांनी वाहक व चालक यांच्या समस्या परिवहन विभागाने समजून घ्याव्यात व व त्यांना योग्य सुविधा द्याव्यात अशी मागणी केली हे नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी नेत्र तपासणी शिबीर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा विश्वंभर स्वामी, संघाचे सचिव शिवाजी पाटील वाडवनकर ,चंद्रकांत शिंदे ,गजानन भुसारे, दिनकर मदेवाड,सुरेश डबीर बालाजी काळे ,वसंत पवार ,जगन्नाथ पुणे,प्रा बालाजी कारामुंगीकर, गोविंद काळे, उदय गुंडीले, बलभीम पवार, शिवाजी गायकवाड, बालाजी पारेकर, अरविंद पोळ , जगन्नाथ पुणे महाजन, मासूम शेख,हे सर्व पत्रकार बांधव कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बालाजी कारामुंगी कर यांनी केले प्रास्ताविक प्रा विश्वंभर स्वामी यांनी तर आभार गजानन भुसारे यांनी मानले यावेळी अहमदपूर आगारातील वाहक-चालक व तांत्रिक विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते लातूर परिवहन विभागात दहा लाख किलोमीटर मागे केवळ एक अपघात जिल्हा वाहतूक नियंत्रक अभय देशमुख लातूर जिल्ह्यात अपघात होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून दहा लाख किलोमीटर मागे 100001 अपघात असे सूत्र असून त्यामुळे महाराष्ट्रात लातूर विभागाचा नावलौकिक आहे सद्यस्थितीत लातूर विभागात चार कोटी निव्वळ नफा कमावून महाराष्ट्रात अग्रस्थानी आहे अमदपुर आगार ही उत्पन्नाच्या दृष्टीने व इंधन बचती मध्ये बऱ्याच वेळेस प्रथम क्रमांक आला असून आगाराची सेवा ही चांगली सेवा म्हणून गणली जाते असे जिल्हा वाहतूक नियंत्रक अभय देशमुख यांनी सांगितले
पत्रकारांच्या वतीने चालक वाहक यांची मोफत नेत्र तपासणी