सब कुछ दाल में काला;आग भडकली,जीवीत हानी नाही
लातूर/प्रतिनिधी :-गोरगरिबंाना अपघात स्थळी तातडीने मदत व्हावी यासाठी केंद्र व राज्य शासनाने राष्ट्रीय रूग्णवाहिका विनामुल्ये सेवा नागरिकासाठी खुली केली असून यासाठी १०८ नं डायल करा अन् तातडीने रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल होईल अशी योजना शासनाने सुरू केली असून या योजनेचा लाभ कोणाला मिळतो आणि कोणाला मिळत नाही की याचा मलिदा कत्राटदारांलाच मिळतो का? याबाबत बोलने योग्य नाही मात्र आज सकाळी या कार्यालयाला,गोडावूनला शॉटसर्किटमुळे आग लागली या आगीत कोणाची जिवीत हानी झालेली नाही.मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वेळेवर अग्निशामक दलाचे बंब पोहोचले नसते तर कदाचित मोठी घटना या ठिकाणी घडली असती कारण त्या गोडावूनमध्ये बायोडीझेलचे मोठ मोठा साठा या गोडावूनमध्ये साठवून ठेवलेला होता कदाचित यांचा स्पोट झाला असता तर अनेकांना जीव गमवावा लागला असता.अशी प्रतिक्रया आसपासच्या नागरिकांनी दै.कुलस्वामिनी संदेशला बोलताना दिली.