काजळ हिप्परगा,लांजी -तांबटसांगवी,मावलगांव ग्रामपंचायतचे निवेदन
अहमदपूर : ( उदय गुंडीले) संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता वीज पुरवठ्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी काजळ हिप्परगा,लांजी - तांबटसांगवी,मावलगांव या ग्रामपंचायतीने तहसिलदार यांना निवेदन देऊ केली.
सविस्तर माहिती अशी की, काजळ हिप्परगा,लांजी - तांबटसांगवी,मावलगांव या गावाला सार्वजनीक पाणीपुरवठा तलावातून करण्यात येत असतो. याच तलावातून शेतीसाठी पाणी दिले जाते. त्यामूळे सध्या आठ तास वीजेचा पुरवठा करण्यात येत असल्यामूळे शेतकरी तलावातील भरमसाठ पाण्याचा उपसा केला जात आहे.तसेच रात्रीच्या वेळी लाईट असल्यामूळे पाण्याचा अपव्यय वाढला आहे. त्यामूळे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून तसेच दक्षता म्हणून वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करुन वीजपुरवठा कमी करण्यात यावा. कारण की पाणी उपसा कमी होईल. पाणी बचत होऊन भविष्यामध्ये पाणीसाठा पुरण्यास मदत होईल. म्हणून रोकडा सावरगाव ३३ के.व्ही. उपकेंद्रा अंतर्गत काजळ हिप्परगा फिडरचे थ्री फेस वीजपुरवठा वेळ कमी करण्यात यावे. अशी मागणी काजळ हिप्परगा,लांजी -तांबटसांगवी,मावलगांव गावाच्या सरपंचानी निवेदन देऊन मागणी केली आहे.