-हेमंत मुसरीफ पुणे.
धावाधाव करे किती
उतार वयात काका
बायको मज छळते
म्हणते जरासे शिका
नातवाचे लाड करा
साधावा छान मोका
उबदार द्यावी गादी
नघ्यावा केवळ मुका
पावसात भिजा असे
दुस-या याव्या शिंका
ए एम पी एम भेटावे
येवो कुणाला शंका
बोट धरून शिकवावे
कसा द्यायचा धोका
इडीबिडी चिडाचिडी
ढवळून काढा लोका
बस एक लोहारकी
असा मारावा दणका
बांधावर फिरालं जर
कणखर होई मणका
वाघाची करा मावशी
पाळून ठेवावा बोका
हुकूम ठेवावा हातात
जोकर वेळेवर फेका