-हेमंत मुसरीफ पुणे
सत्ताधीशा भोवताली
नेहमी गर्दी घोळखा
कोण आपला परका
वेळे वरती ओळखा
मदतीला ऐन वेळी
धावतो कुणी नवखा
गळ्यातला नागघाली
गळ्यालाचं विळखा
कोळसा आणि हिरा
फरक नीट पारखा
काना मागला कुणी
करी आपला पारखा
बहुरूपी अन् खरा
दिसेल एकसारखा
भुलूनं जाई आपण
वरुन लावल्या वर्खा
आंत स्वभाव वेगळा
गळून पडता बुरखा
शहाणपण एवढंही
समजलं नाही मुर्खा