विपरीत बुध्दीपोटी फळे काकदृष्टी
        महाराष्ट्राला संत महंतांची भूमि म्हणून ओळखलं जातं. त्याच संत महंतांच्या भूमित 33 कोटी देवी देवतांचे अस्तित्व माणनारा समाजही आहे. एकूणच कोणत्याही सामाजिक बाबींमध्ये चांगल्या वाईट दोन्ही बाजू अस्तित्वात आहेत पण या दोन्ही बाजूंपैकी चांगल्या म्हणजेच सकारात्मक बाबींचा अंगिकार करुन आपले जीवन व्यतित करणे हा मानवी धर्म असावा अशी अपेक्षा भारतीय संस्कृतीच्या शिकवणीतून सध्या उपजने गरजेचे आहे. कारण संस्कृतीचे जतन करण्यासाठी अघोरी पध्दतीचे अनुकरण करुन आपण परमार्थ करावा अशी शिकवण हिंदू संस्कृतीत दिली जाते. परंतू काही वृत्तींमध्ये अशिक्षीत पणा असेलल किंवा भितीपोटी भक्तीचा दुराचारी वापर होत असेल यात शंकाच नाही. परंतू भारतीयांच्या पारमार्थिक जीवनात महाराष्ट्रातील वारकरी सांप्रादायाचाही मोलाचा वाटा आहे. याच वारकरी सांप्रादायाने महाराष्ट्राला संत तुकारामांपासून, संतज्ञानेश्‍वर असोत की आजपर्यंतचे अनेक प्रबोधनकारी दिले आहेत. समाज प्रबोधनातून समाजनिर्मिती करणे आणि समाजाला उच्च जिवनशैली प्रदान करणे हिच या वारकरी संप्रादायाची प्रांजळ भावना आहे. ज्याचा अनुभव आमच्या कित्तेक पिढ्यांनी घेऊन त्यांच्याच शिकवणीवर जगाता एक आदर्श जीवन प्रणाली उपलब्ध करुन दिली आहे. परंतू त्याच भारतीय संस्कृतीत अधुनिकतेचे अनुकरण करण्याच्या आणि क्रांतीकारी परंपरेची निर्मिती करण्याच्या हव्यासापोटी विपरीत बुध्दी निर्माण होऊन काकदृष्टी म्हणजे समाजातलं चांगलं काहीच न पाहता केवळ आपल्या व्यक्तिगत प्रसिध्दीपोटी समाजाला प्रबोधन करणार्‍यांना सुध्दा त्यांच्या प्रबोधनातील वक्तव्याचा काकवृत्तीने चुकीचा अर्थ काढून त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरु केलाय हे आपण सध्या महाराष्ट्रात अनुभवतोय. गेल्या 26 वर्षांपासून अविरतपणे किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची सेवा करणार्‍या निवृत्ती महाराज इंदुरीकरांना याचा सध्या मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यांच्या कीर्तनात आजपर्यंत जे विपरीत झाले नाही ते गेल्या आठ दिवसात झाले आहे. महाराजांच्या याच धड्याविरोधात आता अंनिसनं नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. हभप किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या एका वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एका किर्तनात त्यांनी समतिथीला स्त्रीयांशी संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तिथीला संबंध ठेवल्यास मुलगी होते असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले. यादरम्यान इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अनेक लोकं पुढे आले आहेत. याबरोबरच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील इंदुरीकर महाराजांचे समर्थन केले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदुरीकर महाराजांचं समर्थन केलं आहे. दोन तासांच्या कीर्तनातून एखादा शब्द चुकीचा  जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे. समर्थकांप्रमाणेच बच्चू कडूंनी देखील इंदुरीकर महाराजांच समर्थन केलं आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी इथं शिव जयंती निमित्त आयोजित कीर्तनामध्ये महाराज बोलत होते. मी जे गेले 26 वर्ष बोलतोय तेच आता ही बोलतोय, पण माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला.’ असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे. या कीर्तनाला प्रसार माध्यमांना परवानगी नाकारण्यात आली होती, एवढच नाही तर कोणत्याही प्रकारे चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली होती. इंदुरीकर महाराजांविरोधात नगरमध्ये तक्रार दाखल झाली असून उद्या तृप्ती देसाईही इंदूरीकरांविरोधात तक्रार द्यायला नगरमध्ये जाणार आहेत. इंदूरीकर महाराजांचा चाहता वर्ग मोठा आहे. पण एका वक्तव्यामुळे ते वादात सापडले आहेत. इंदुरीकर महाराज यांच्या समर्थकांचं सोशल मीडियावर वादळ आलं आहे. इंदुरीकर यांच्या नावामुळे आपलीही प्रसिद्धी होईल, यामुळे इंदुरीकरांवर टीका करणारे पुढे येत असल्याचा आरोपही इंदुरीकर समर्थकांकडून केला जात आहे. तर इंदुरीकर महाराजांवर सिंधुताई सपकाळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इंदुरीकर हे चांगले व्यक्ती आहेत. बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून बोललं गलं असेल असं मत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळांनी व्यक्त केलं आहे.  तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदुरीकर महाराजांचं समर्थन केलं आहे. दोन तासांच्या कीर्तनातून एखादा शब्द चुकीचा  जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे. समर्थकांप्रमाणेच बच्चू कडूंनी देखील इंदुरीकर महाराजांच समर्थन केलं आहे. इंदुरीकरांनी सम-विषम वादावर अस्त्र काढलं आहे. इंदुरीकरांनी वादावर भूमिका घेताना म्हटलं आहे. आता याविषयी काहीही बोलणार नाही. एकंदरीत इंदुरीकरांनी आता मौन अस्त्र संपूर्ण वादावर वापरलं आहे. यामुळे इंदुरीकरांनी कोणतंही भाष्य वादावर न केल्याने, इंदुरीकर विरोधकांची मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे. इंदुरीकरांनी आपल्या ठरलेल्या तारखांप्रमाणे कीर्तन करण्याचा धडाका चालूच ठेवला आहे. एकूणच काय तर महाराष्ट्रात कावळ्याच्या वृत्तीची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, ती ही समाजकारणात, राजकारणात आणि अर्थकारणातही. तृप्ती देसाई सारख्या अनेक वृत्तीं सध्या अमर्यादित स्वातंत्र्याचा स्वैराचारी वापर करुन सामाजिक विदृपीकरण करुन समाजात वैचारिक प्रदुषण निर्माण करत आहेत. त्यामुळे जगात श्रेष्ठ समजल्या जाणार्‍या भारतीय संस्कृतीकडे आता जगाची काकदृष्टी पडायला नको असेच म्हणायची वेळ आली आहे. कारण एखाद्या घरात भांडण लागल्यास शेजारी त्या घरातील संस्कारांना आणि त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेल्या शिकवणीला दोषी ठरवून मोकळे होतात. तसाच प्रकार आपल्या येथेही होताना दिसतोय. कारण यापूर्वीही तृप्ती देसाईंनी शनी मंदिराच्या चौथर्‍यावर महिलांना जाण्याचा अधिकार मिळवून पारंपारीक पावित्र्याला बाधा पोहचवण्याचे कार्य केले आहे तसेच आता महाराष्ट्रातील वारकरी सांप्रादयाला वादात घेऊन स्वतःचे महत्व वाढवण्याचा प्रयत्न चालवलाय एवढच यातून सांगावस वाटतय.