जंगली  माणूस. ...
- हेमंत मुसरीफ पुणे 

 

हिंडता  ताडोबा जंगलात 

वाघ  येवून  उभा पुढ्यात 

अलभ्य लाभ घडला जरी 

ठोका चुकला  काळजात

 

पहात आम्हा "माणसाला "

शांतपणे तो  निघून  गेला

आठवून  रूप  माणसाचे 

रात्र  भर   नसेल झोपला