लातूरचे मनपा आयुक्त देवेंद्र्सींह यांची अखेर बदली


लातूर/प्रतिनिधी:-लातूर महापालिका सतत कोणत्या ना कोणत्या चर्चेत असतेच महापालिकेत भाजपची सत्ता असतानासुद्धा कॉग्रेसच्या चाणक्क्ष नगरसेवकांनी खेळी करून कॉग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना महापौर पदी बसवीण्यात आले आहे.पंरतु विक्रांत गोजमगुंडे महापौर झाल्यापासून आयुक्त एस देवेंद्र सिंह आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यामधून आडवा विस्तूही जात नसल्याने अनेक कामे खोळबंली होती.यातच अखेर आज आयुक्त एस देवेंद्र सिंह यांची यवतमाळला जिल्हाधिकारी म्हणून  बदली झाली असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात येत आहे.
लातूर महापालिका अधिच दिवाळखोरीत असून कसाबसा महापालिकेचा गाडा चालत आहे. आयुक्त  म्हणून यापूर्वी आपली कारर्किद लातूर महापालिकेत चांगल्या प्रकारे दाखवलेली होती.परंतु त्या अधिकार्‍याची महापालिकेतील महापौरांनी आपल्या सोयीनूसार आयुक्त पाहिजे यासाठी आटापिटा करून चांगल्या आयुक्तीची बदली केली होती.त्या बद्ल्यात लातूर मनपाला आयुक्त म्हणून एस देवेंद्र सिंह यांनी पद्भार स्विाकरला होता परंतु त्यांच्या कामाची पद्धत आणि लातूर महापलिकेचा खेळ मेळ न जमल्याने सिंह यांच्यावर नाकर्तेपणाचा आरोप सतत केला जात होता.त्यातच लातूरमनपाची सत्ता भाजपाच्या हातून जाऊन कॉग्रेसच्या हाती आल्याने आयुक्त सिंह यांनी अनेक वेळा कामचूकारपणा करण्याचा प्रयत्न केला हेाता.त्यातच त्याची आज यवतमाळला जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.आता लातूर महापालिकेला आयुक्त म्हणून कोस्तुभ दिवेगावकर यांनाच नेमणूक द्यावी अशी मागणी लातूरातील काही नागरिकांनी केली आहे.