रासेयोच्या शिबिरात मानकी येथे पशु आरोग्य तपासणी शिबीर संपन्न


देवणी /प्रतिनिधी :-  देवणी येथील कै. रसिका महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे "पर्यावरण नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन व स्वच्छ भारत अभियान साठी युवक शिबिर" सुरु आहे या शिबिराच्या पाचव्या दिवशी पशु आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये जनावरांना एफ डी एम ही खुरांची लस टोचण्यात आली तसेच गाय व म्हशी मधील वांझत्व ची तपासणी, त्वचारोग, गोचीड फवारणी इत्यादी आजारांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथील डॉ. अनिल पाटील डॉ. सुरेश घोके डॉ. संजय राठोड व त्यांचे विद्यार्थी तसेच देवनी येथील डॉ. कपाळे व त्यांचे सहकारी यांनी पशु आरोग्य तपासणी शिबिर घेण्यास सहकार्य केले हे शिबिर यशस्वी होण्यासाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी  डॉ.पी. आर. मोरे कार्यक्रमाधिकारी डॉ. गोपाल सोमानी  व रासेयोचे सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.