जिल्ह्यातील पाणटपर्‍या आजपासून बंद, कोरोनाची दहशत वाढली...!


लातूर (प्रतिनिधी):-राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूविषयी मोटी दहशत निर्माण झालेली असून राज्यभरात या रोगाचे संशयित रूग्ण रोजच रूग्णालयात दाखल होत असूल्याने यातील पुणे मुंबई व ईतर मोट्या शहरात काही रूग्ण पॉझीटीव्ह साफडल्याने मराठवाड्यात कोरोनाची दहशत चांगलीच वाढली असल्याने आरोग्य प्रशासन काळजी घेण्यासाठी नांगरिकांना आवाहन करत आहे.त्यातच आज लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी कोरोनाचा प्रार्दभाव रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तंबाखू व तंबाखूजन्य धूम्रपान विक्री करणार्‍या सर्व पानटपर्‍या आजपासून दि.३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पारित केल्याने गुटखा शोकीन आणि सुंगधी सुपारी खानार्‍या नागरिकांची चांगलीच पंचायत झाल्याची दिसून येत आहे.
      शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लातूर जिल्हयातील तंबाखू व तंबाखूजन्य धूम्रपानाचे पदार्थ इ. ची विक्री करणारी सर्व दुकाने/ पान शॉप/ पान टपर्‍या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित केले आहे.या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर विरुध्द भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कार्यवाही करण्यात यावी सदरहू आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहे.
 २५  प्रवाश्याचे अहवाल निगेटीव्ह
 जिल्हयात आजतागायत कोरोना कोविड-१९ आजाराचे एकूण २५ प्रवासी/ सहवासितांचे स्वॅब  तपासणीसाठी एन.आय.व्ही.पुणे या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले आहेत. त्यापैकी-१८ प्रवासी/सहवासतिांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून -७ प्रवासी/सहवासितांचे तपासणी अहवाल अद्याप अप्राप्त आहेत.  कोरोना या विषाणूचा संसर्ग सदृश्य लक्षणे असणारा एकही रुग्ण् लातूर जिल्हयात आढळून आलेला नाही असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी कळविले आहे.लातूर जिल्हयात बाहेर देशातून /राज्यातून/ जिल्हयातून आलेले प्रवासी व सहवासित यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.लातूर जिल्हयात जिल्हास्तरावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र बाहरुग्ण् विभाग सुरु करण्यात आलेला आहे.तसेच - ४७ खाटांचे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आलेले असून सदर कक्ष - २४ तास कार्यान्वित करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत  मध्ये करोना बाधित रुग्ण् दाखल झालेला नाही.