जिल्हयातील 91 पैकी 84 निगेटीव्ह, 4 पॉझिटिव्ह तर 3 अनिर्णित*


लातूर, दि.23(जिमाका):- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 23 मे 2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण 91 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी या संस्थेतील 43 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी  40 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 2 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 1 व्यक्तींचा अहवाल (Inconclusive) आला आहे.
      त्यापैकी *एक  रुग्ण अहमदपूर तालुक्यातील पाटोदा* येथील असून त्याची प्रकृती या रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच गंभीर होती. रुग्णालयात दाखल होताना रक्तदाब कमी होता व त्यांना मागील दोन वर्षांपासून फुफ्फुसाचा आजार Intertitial lung disease   होता व तो त्यावर उपचार घेत होता. सद्यस्थितीत त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. व *दुसरा रुग्ण लातूर येथील 6 वर्षाची मुलगी* असून तिला ताप व निमोनिया असून तिची प्रकृती स्थिर आहे व ती उपचाराला प्रतिसाद देत आहे.

    उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 20 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी  19 व्यक्तींचे अहवाल   निगेटीव्ह आले असुन *एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह* आला आहे.  जळकोट येथुन 2  व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. *रेणापूर येथील 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी  14 व्यक्तींचे अहवाल  निगेटीव्ह आले असुन  एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह* आला असून 2  व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आहेत. मुरुड येथील 7 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 7  व्यक्तीचे अहवाल  निगेटीव्ह आले आहेत. कासारशिरसी येथील 2 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे लातुर जिल्हयातील  एकुण 91 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 84 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 04 व्यक्तींचे अहवाल  पॉझिटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.