मुंबई :- ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप्स आणि पानाची दुकानं सोमवारपासून उघडण्यात येणार आहेत. ग्राहकांनी वाइन शॉप किंवा पानाच्या गादीवर सहा फूट अंतर राखून रांग लावावी असं सांगण्यात आलं आहे. पाचपेक्षा जास्त माणसं एकावेळी शॉपमध्ये असू नये असंही सांगण्यात आलं आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्यात आला असला तरीही ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप आणि पानाची गादी सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भातले निर्देश दिले आहेत. Aछख या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. काय आहेत अटी शर्थी? वाइन शॉप्स, पानाची दुकानं फक्त ग्रीन झोनमध्येच उघडली जाणार खरेदी करताना ग्राहकांनी सहा फुटांचं अंतर राखणं आवश्यक एकावेळी शॉपमध्ये पाचपेक्षा जास्त लोक नकोत महाराष्ट्रातले किती जिल्हे ग्रीन झोनमध्ये? उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा
वाइन शॉप्स आणि पानाची दुकानं सुरू