जिल्हा आरोग्य यंत्रणांवर असलेल्या भाराचे गांभीर्य लक्षात घ्यावे
कोविड-१९ चा संक्रमण सुरु झाल्यापासून देशातील सर्वच स्तरावरील आरोग्य व अन्य सर्व यंत्रणांवर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणांचाच घटक असणार्या गाव पातळीवरच्या असोत की तालुका पातळीवरच्या आरोग्य यंत्रणांना एकमेकांमध्ये समन्वय ठेऊन या काळात येणार्या प्रत्येक रुग्णाला आपण देवाप्रमाण त्यांचे जिवनदान देण्याचे अतिशय जबाबदारीने कर्तव्य बजावायाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामिण भागांसह तालुका स्तरावर असणार्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणांना सहकार्य करणे अपेक्षीत आहे. परंतू तो समन्वय न ठेवता त्यांच्याबद्दल उलट सुलट चर्चा करुन रुग्ण आणि कर्मचारी यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम त्यांनी करुन नये असे महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकिय अधिकारी गट ‘अ’ सार्वजनिक आरोग्य विभाग शाखा, लातूर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
लातूर/प्रतिनिधी ः कोरोना महामारीच्या संकटाने देशात थैमान घातलेले असताना मात्र महाराष्ट्ररात आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांवर सरकारचे नियंत्रण नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. कोरोना संक्रमणाच्या गांभिर्यशून्यतेची प्रचिती आज लातूर येथे जिल्हाधिकार्यांना जिल्ह्यातील डॉक्टरांच्या संघटनांनी दिलेल्या निवेदनावरून ते स्पष्टपणे उघड झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, लातूर येथील मा. जिल्हाधिकारी यांना काल दि. २० मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकिय अधिकारी गट ‘अ’ सार्वजनिक आरोग्य विभाग शाखा लातूर यांच्या वतीने दिलेल्या निवेदनावरुन स्पष्ट झाले. या निवेदनावरुन असे स्पष्ट होते की, जिल्हाभरातील ग्रामिण, तथा तालुका स्तरीय जिल्हा अरोग्य यंत्रणांच्या आखत्यारित येणार्या वैद्यकिय अधिकार्यांकडून जिल्हा अरोग्य यंत्रणांच्या अंतर्गत असणार्या वा जिल्हा आरोग्य विभागातील व स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय विज्ञान संस्था, लातूर येथे कार्यरत असणार्या आरोग्य यंत्रणांमध्ये अंतर्गत समन्वय नसल्याचे दिसून येते.
वैद्यकिय अधिकार्यांच्या या निवेदनावरुन असे लक्षात येते की, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांवर नियंत्रण ठेवणार्या प्रशासकिय अधिकारी किंवा यंत्रणांचा एकमेकांमध्ये समन्वय नसावा किंवा असला तरी त्यांच्याकडून कोरोनाच्या परिस्थितीचं गांभिर्य लक्षात न घेता यरवी ज्या प्रमाणे वर्तन केले जातं त्याप्रमाणेच ठिल्लरपणाची कर्तबगारी करुन केवळ महिन्याकाठच्या पगाराला गाठ घालण्याचं काम केलं जात असल्याचं उघड होतय.
सध्य स्थितीत लातूरसह राज्यातील मुंबई, पुणे व अन्य औद्योगिक क्षेत्र असणार्या भागात कामासाठी गेलेले अनेक लोकं आप-आपल्या गावी आलेले आहेत. त्यामुळे या भागातून येणार्या नागरिकांकरवी ग्रामिण भागांत कोरोना संक्रमणाची भिती अधिक आहे. या दरम्यान या भागात आलेल्या नागरिकांकडून काही तक्रारी आल्यास ग्रामिण भागातील त्या लोकांबरोबर स्थानिकचे असलेले जिल्हा आरोग्य यंत्रणांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी हे सहकार्याच्या उद्देशाने कर्तव्य बजावत नसून अशा रुग्णांना असंविधानीकपणे वागणूक देतात. त्याशिवाय अशा रुग्णांना प्राथमिक चाचण्या करणे किंवा अपेक्षीत कारवाई न करता सरळ सरळ जिल्हा शल्य चिकीत्सा रुग्णालय किंवा मुख्यालयाला जाण्याचा सल्ला देतात. एव्हाना या बाबत कोणी या अधिकार्यांना किंवा कर्मचार्यांना याबाबत विचारणा केल्यास त्यांच्याशी आरेरावी करुन वरिष्ठ अधिकार्यांना बतावणी करण्याचा धाक दाखवल्यास संबंधित वरिष्ठ अधिकार्यांबद्दलही असंविधानीक भाषा वापरत असल्याचे या निवेदनातील तक्रारीवरुन स्पष्ट होते.
एकूणच काय तर देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरु असताना ग्रामिण भागातील आरोग्य विभागाच्या अशा मगरुर आणि गांभिर्यशून्य अधिकार्यांना संवेदनाच राहिलेल्या नाहीत की काय अशी शंका यायला लागल्यात. त्याशिवाय आपल्या कर्तव्यपूर्तीच्या जबाबदार्या झटकून केवळ आरेरावीचं प्रदर्शन घडवत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्याशिवाय देशासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊनमुळं वाहतुकीच्या सेवा उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांची हेळसांड होत आहे. त्याशिवाय ग्रामिण भागात उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीवर तेथे येणार्या रुग्णांना प्राथमिक उपचार करणे अपेक्षित असताना अशा रुग्णांना ते ही न देता त्यांना सरळ सरळ जिल्हा रुग्णालयाचा रस्ता दाखवण्याचे काम ग्रामिण वा तालुकास्तरीय अधिकारी व आरोग्य कर्मचार्यांकडून केले जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
त्याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून अपेक्षीत असलेल्या तपासण्या करुन योग्य त्या कारवाईची पूर्तता व प्रमाणपत्र संबंधित अधिकार्यांककडून होत नसल्याचे ही यात म्हटले आहे.
प्रातिनिधीक स्वरुपात निवेदनात उल्लेखित करताना भातांगळी, हासेगाव व अन्य अशा प्राथमिक आरोग्य केंद्रासह अन्य नावांचा उल्लेख तारखेसह आणि रुग्णांच्या नावासह करण्यात आलेला आहे. तसेच या रुग्णांना झालेल्या आजार आणि त्यावर त्यांना दिलेल्या उपचारात होत असलेल्या विसंगती यामुळे जिल्हा प्रशासनावर येणारा अधिकचा भार याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे जिल्हा स्तरावरील आणि तालुका व ग्रामिण स्तरावरील अधिकार्यांच्या अंतर्गत कलहामुळे कोरोना महामारीच्या काळातील रुग्णांना झटका बसु नये अशी प्रांजळ अपेक्षा सर्व सामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.