लातूर/ प्रतिनिधी :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तापसणीसाठी महानगरपालिकेकडून आलेले दिनांक 11.06.2020 रोजीचे तीन व्यक्तीचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन्ही व्यक्ती क्रांती नगर लातूर येथील आहेत.
दिनांक 12.06.2020 रोजी या संस्थेतील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सदर व्यक्ती बाभळगाव येथील असून पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे
आज दि. 12/6/2020 रोजी सा. रु. उस्मानाबाद येथून 11 swab वि. दे. शा. वै. महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते. सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले अजून तीन पॉसिटीव्ह 3 incunclusive, व 5 नेगेटिव्ह आले आहेत.
पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती.
एक पेशंट नळदुर्ग येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहे. व दुसरे दोन पेशंट हे पोलीस कॉलनी, परांडा येथील असून सोलापूर रिटर्न्स आहेत.