देवणी/ रणदिवे लक्ष्मण :- देवणी तालूक्यातील व परिसरात मागील 7-8 वर्षात पहिल्यांदाच मृग नक्षञाच्या पहिल्या दिवसा पासून पावसाला सुरुवात झाली. पावसाला वेळेवर आणि पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने काळ्या आईची ओठी भरली. यामध्ये सोयाबीन च्या बियाण्याने मोठ्या प्रमाणात दगा दिला उगवण झाली नसल्यामुळे अनेकांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या.सोयाबीन चा पेरा हा सर्व शेतक-यांनी कमी जास्त प्रमाणात केला असुन तालुक्यात या वर्षी सर्वात जास्त क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला असून आणखीनही शेतकरी पेरणी करत आहे. व काही शेतक-यांच्या बीयाणे दुर अंतरावर उगवले आहे. ते ठेवावे का नाही.या द्विधा मनस्थितीत शेतकरी आहे.पाउस दररोज वापसे मोडण्यासारखी हजेरी लावत आसल्याने बीयाणाची उगवन कीती होते त्यानुसार ठरले जात आहे.नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन उगवण होत नसल्यामुळे आसमानी सुलतानी संकटाच्या सापडला आहे.गावातील अनेक शेतक-यांचे बीयाने उगवून ते ताशी लागले त्यांना माञ आता हरिणांनी ञस्त करुन सोडले आहे. उगवण झालेली कोवळी पिके हरीण फस्त करीत आहेत.हरीण सोयाबीन ची कवळी मोडे खाऊन फस्त करत आहेत यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. देवणी तालूक्यात व देवणी खु लासोना गौडगाव बोरोळ अजणी . देवणी .बोरोळ. वलाडी विभाग अर्तगत. परिसरात व जवळपास शंभर ते दिडशे हरिण असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हे हरिण 30-40 च्या टोळीने राहतात. एकदा जर पिकात शिरले कोवळी मोड खाऊन फस्त करतात. यामुळे कांही शेतकऱ्यांना आता पुन्हा पेरणी करण्याची वेळ येत असून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.वनविभागाचे अधिकारी याकडे कधी लक्ष देतील असा सवाल येथील शेतकरी करत आहेत..
हरणांच्या उपद्रवामुळे शेतकरी ञस्त कोवळी पिके करत आहेत फस्त, वनविभागाचे दुर्लक्ष