फुलवळ कंटेन्मेंट च्या नावाखाली फक्त फोटोशेषण,येथील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू होऊनही प्रशासन नाही जागरूक.

ना प्रशासन सतर्क , ना ग्रामस्थ गंभीर.


 


कंधार/शेख शादुल :- कंधार तालुक्यातील फुलवळ येथील एका ६४ वर्षीय पुरुषाला ता. १३ जुलै रोजी विष्णुपुरी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली आणि ता . १४ जुलै रोज मंगळवारी कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला . या घटनेमुळे फुलवळ सह परिसरात सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले. त्याच बाधित रुग्णाचा ता. १६ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.


 


      फुलवळ मध्ये पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळताच शासन , प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरावर तातडीने खूप मोठ्या प्रतिबंधक परिसर म्हणून फुलवळ जाहीर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या खऱ्या. एवढेच नाही तर उपविभागीय अधिकारी कार्यालय कंधार च्या वतीने फुलवळ कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर करून त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून अनेक गोष्टींची काळजी घेण्यासाठी विविध अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली विविध कार्यवाही होणार असल्याचे परिपत्रक ही खूपच घाई घाईने काढण्यात आले.


 


    तसेच गावात आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य पथक नेमून गाव नाकाबंदी करून कलम १४४ लागू करून नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांच्या व कार्यरत ग्रामपंचायत च्या मार्गदर्शनाखाली विविध उपाय योजना राबवाव्यात असे आदेश ही काढण्यात आले.


 


         परंतु फुलवळ कंटेंटमेंट झोन जाहीर करून व प्रतिबंधक भागात ज्या सुविधा , उपाययोजना राबवणे आवश्यक आहे त्या कार्यरत करण्याचे आदेश देऊन तब्बल तीन दिवस वर झाले परंतु येथे केवळ ग्रामपंचायत ने ज्या भागात पॉझिटीव्ह रुग्ण सापडला त्या भागात रस्ता बंद करून सॅनिटायझर ची फवारणी आणि जागरूकता करण्यापलीकडे प्रशासनाच्या वतीने दुसऱ्या कसल्याच सुविधा किंवा उपाययोजना कोणीही केल्या नाहीत. तर आरोग्य विभागाच्या वतीने जुनेगावठाण येथील सर्व्हे करणे एवढेच काम केलर आहे .


 


     परंतु उपविभागीय अधिकारी यांनी परिपत्रकात नमूद केलेले विविध विषय आणि ज्यांच्याकडे ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत ते अधिकारी , कर्मचारी तर गावात फिरकलेली नाही आणि त्यातले जे कोणी आले ते केवळ फोटोशेषन करून गेले . कारण त्या फोटो वरिष्ठांना पाठवायच्या आणि मी भेट देऊन पाहणी केली असा रिपोर्ट सादर करून हात झटकून मोकळे व्हायचे बस्स एवढेच चालू आहे.


 


        ग्रामस्थांनी स्वतःच्या मरणाच्या भीतीपोटी स्वयंस्फूर्तीने काही गोष्ठी नक्कीच पाळल्या , पूर्ण दुकाने बंद ठेवल्याने रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट आहे . परंतु गावात पॉझिटीव्ह रुग्ण आढल्यानंतर इतर काही लोक जे की त्या रुग्णाच्या शेजारी राहतात किंवा संपर्कात आले त्यांना फक्त कवारांटाईन करून प्रश्न सुटणार का ? 


 


    तर त्यांना लागणाऱ्या इतर सर्व सुविधा मिळणे ही आवश्यक आहे . परंतु त्या मिळत नसल्यामुळे नागरिकांतुन संताप व्यक्त केला जात आहे. आणि आवश्यक त्या सुविधा लवकरात लवकर पुरवल्या जाव्यात अशी मागणी जोर धरत आहे. एवढेच नाहीतर अशा गंभीर परिस्थितीत ही शासन , प्रशासन दखल घेत नसेल तर नेमकं कोणावर विश्वास ठेवायचा अशी चिंता व्यक्त करत आता आपण स्वतःच स्वतःचा बचाव करण्यापलीकडे पर्याय नाही असे म्हणून या काळात ज्या आवश्यक मूलभूत सुविधा मिळायला पाहिजेत त्या शासन , प्रशासन पुरवठा न करता जणूकाही नागरिकांच्या जीवशीच खेळ खेळतंय की काय ? असा सवाल ही उपस्थित करत या यंत्रणेबाबद असंतोष व्यक्त केला जात आहे.