नायगावशहरात लोकडाऊन काळात कडक नियम,अनुपालन केल्यास कार्यवाही

नायगाव/प्रतिनिधी :- 


नायगाव नगर पंचजयतच्या वतीने लोकडाऊन च्या कालावधीतील नागरिक व व्यापारी,व्यावसायिक यांनी घ्यावयाची काळजी या बाबद एक परिपत्रक काढले असून याचे अनुपालन करावे नाही केल्यास कार्यवाहिला सामोरे जावे लागेल असे पत्रकात नमूद केले आहे.


    नायगाव शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा दुसरा भाग म्हणून दिनांक 12 जुलै 2020 पासून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील लोकडाऊन च्या पार्श्वभूमीवर खालील प्रमाणे सूचना व आदेश काढला आहे.      


 


    आवश्यक दूध व भाजीपाला सकाळी सात ते दहा व खताचे दुकान सकाळी सात ते दोन व दवाखाना औषधालय वगळून इतर आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्याबाबत संदर्भ आधारे आदेशित करण्यात आले आहे.नायगाव शहरातील दुकानदारांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे व आदेशाचे उल्लंघन करू नये आपले दुकान चालू ठेवून दुकानावर अनावश्यक गर्दी तसेच सोशल डिस्टन्स चा भंग केल्याचे दिसून आल्यास आपणा विरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कलम 51 भादवि कलम 188 गुन्हा दाखल करण्यात येईल नगरपंचायतचे अध्यक्ष शरद भालेराव,उप नगरअध्यक्ष विजय पा.चव्हाण व प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर यांनी आवाहन।केले आहे. 


 


   तरी नायगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे कोणत्याही प्रकारे नियमाचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी त्याच बरोबर अत्यावश्यक काम असल्यास तोंडावर मास्क न घालता घराबाहेर पडू नये अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणते आस्थापना पब्लिक दुकाने उघडून विनाकारण गर्दी केल्याचे निदर्शनास आल्यास आपण वरील कार्यवाही करण्यात येईल असे नगरपंचायत तर्फे आवाहन करण्यात पत्रकात केले आहे.