नांदेड/ प्रतिनिधी :- रयत क्रांती संघटना तर्फे नायगाव तालुक्यातील विविध गावात मोफत पंतप्रधान पिक विमा योजनेचे फॉर्म भरणे व किसान क्रेडिट कार्ड काढणे शेतकरी उपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहे.
शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या सूचनेनुसार युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या संकल्पनेतून टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने हा उपक्रम चालू केला आहे. आज मांजरम येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे चौथा दिवस शिबिराचा संपन्न झाला.
या शिबिराला शेतकऱ्याचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
------------------------------------------
पांडुरंग शिंदे म्हणाले, आम्ही रयत क्रांती संघटना तर्फे हे शिबीर ९ जुलै पासून सुरू केले आहे. २० जुलै पर्यंत वेगवेगळ्या गावात घेण्याचे नियोजन आहे पण जिल्ह्यात १३ जुलैपासून संचारबंदी लागू केली आहे, प्रशासनाने जर परवानगी दिली तरच पुढील गावात शिबिर होईल आमची जिल्हाधिकारी यांना विनंती आहे, पंतप्रधान पिक विमा योजना भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै आहे. शेवटच्या दहा दिवसात शेतू केंद्रावर गर्दी टाळायची असेल व साईटचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचे फॉर्म भरण्याची सवलत संचारबंदीच्या काळात द्यावी ही विनंती.
यावेळी भानुदास शिंदे, हासनाबादे, शिवाजीराव गायकवाड, व्यंकट शिंदे, विठ्ठलराव भोंदे, सलीम शेख व अनेक शेतकरी उपस्थित होते.