नांदेड / संदिप कांबळे :- मराठवाड्याचे भाग्यविधाते,जलप्रणेते श्रद्धेय डाॅ.शंकररावजी चव्हाण यांची जयंती दरवर्षी दि.१४ जुलै रोजी साजरी करण्यात येते मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरी राहून जयंती साजरी करावी असे आवाहन नायगांव तालुका कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष संभाजी भिलवंडे यांनी केले आहे .
दरवर्षीआपण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन कै. साहेबांना आदरांजली अर्पण करतो. हे वर्ष साहेबांच्या जयंतीचे जन्मशताब्दी वर्ष आहे,असे आसताना ही करोना विषाणुच्या वाढत्या संसर्गामूळे मा.जिल्हाधिकारी यांनी दि.१२जुलै पासून संपुर्ण जिल्ह्यात लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे दि.१४जुलै रोजी साजरी होणारी जयंती आपण सर्वजन घरुनच साजरी करावे असे आवाहन नायगांव तालुका कॉग्रेसच्या वतीने केले आहे .