राष्ट्रसंत प.पू.डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी नंदीग्राम येथे घेतला अखेरचा श्वास


अहमदपूर /प्रतिनिधी, उदय गुंडीले : अहमदपूर येथील वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नांदेड येथील नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अखेर निधन झाले आहे.


    सविस्तर असे की,अहमदपूर येथील सुप्रसिध्द राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले आहे.महाराजांची प्रकृती मागील चार दिवसापासून ढासळली होती आणि चार दिवसांपूर्वी त्यांच्याबद्दल असा मॅसेज फिरला होता की महाराज जीवन समाधी घेणार म्हणून अहमदपूर मध्ये भक्तिस्थळावर हजारोंचा भक्ती समुदाय जमा झाला होता.तेव्हापासून महाराजांना नांदेड येथे हॉस्पिटलला घेऊन गेले असता आज दुपारी १२ ते १.०० दरम्यान अचानक त्यांचे निधन झाले आहे.तरी महाराजांचा अंत्यविधी अहमदपूर येथील भक्तिस्थळा वर करण्यात येणार आहे.तरी याठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्थ लावण्यात आला आहे.भक्तांना अंतिम दर्शन सुद्धा घेणे शक्य नसल्याने अंत्यविधी रात्री होणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.


       महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे महाराजांच्या अंत्यविधी साठी महाराष्ट्र,तेलंगणा,कर्नाटक व इतर राज्यातून भक्त तसेच राजकीय, सामाजिक, वारकरी सांप्रदाय मंडळी येण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.