सीएए,एनआरसी,एनपीआर विरोधी मंचच्या धरणे आंदोलन प्रतिसाद

आज कोळसे पाटील व कोरणेश्‍वर महास्वामी यांचे मार्गदर्शन होणार



 लातूर,दि.२३ः सीएए,एनआरसी,एनपीआर विरोधी मंच,आम्ही लातूरकर च्या वतीने लातूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर एनआरसी,एनपीआर व एनआरसी विरोधात दि.२२ जानेवारी ते पासून आयोजिलेल्या धरणे आंदोलनास विविध पक्ष,संघटना,कार्यकर्ते,नेत्यांंसह नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, शुक्रवार,दि.२४ जानेवारी २०२० रोजीच्या  या आंंदोलनात उच्च न्यायालयाचे माजी न्या.बी.जी.कोळसे पाटील आणि लिंगायत धर्मगुरु कोरणेश्‍वर महास्वामी यंाचे दुपारी ४ वाजता प्रमुख मार्गदर्शन होणार असल्याने जास्तीत  जास्त संविधानप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर आयोजित या सीएए,एनआरसी,एनपीआर विरोधी मंच ,आम्ही लातूरकर च्या धरणे आंदोलनास दि.२२ जानेवारीला ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुर्गाप्पा खुमसे यांच्या हस्ते,ऍड.मनेाहरराव गोमारे, प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, मानव मुक्ती मिशनचे नितीन सावंत, अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे, शेकाप नेते ऍड.उदय गवारे, संदिपान बडगीरे, निशा बडगीरे, उस्मान शेख गुरुजी, ऍड.आर.वाय.शेख, ऍड.एम.आय.शेख ,माजी महापौर अख्तर मिस्त्री,संभाजी ब्रिगेडचे ऍड.गोविंद सिरसाट, रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.युवराज धसवाडीकर, मुप्टाचे डॉ.हर्षवर्धन कोल्हापूरे, आदिवासी नेते रामराजे आत्राम यंाच्या उपस्थिती आरंभ करण्यात आला.
 पहिल्या दिवशीच्या आंदेालनात दिवसा व रात्री उपस्थितांचे विचार, सांस्कृतिक कार्यक्रम, गझल, कविता, देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. यावेळी शहरातील विद्यार्थी, युवक,ज्येष्ठ नागरिक,परिवर्तनवादी व देशप्रेमीं कार्यकर्ते मोठ्या संख्येने  सामील झाले होते.
 आंदोलनाच्या गुरुवारी दुसर्या दिवशी दिवसभर ऍड.मनोहरराव गोमारे,ऍड.उदय गवारे,डॉ.अमीर शेख, प्रा.हर्षवर्धन कोल्हापूरे, प्रा.युवराज धसवाडीकर, डॉ.असद पटेल, जिल्हा वकील मंडळाचे माजी अध्ययक्ष ऍड.आर.वाय.शेख, ऍड.गोविंद सिरसाट, ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी,डी.एस.नरसिंगे आदिंची केंद्र सरकारच्या संविधानविरोधी भूमिकेवर संडकून टिका करणारी भाषणे झाली.
 आज कोळसे पाटील
 कोरणेश्‍वर यांचे मार्गदर्शन
 दरम्यान, शुक्रवार,दि.२४ जानेवारी रोजी दुपारी ४  वाजता धरणे आंदोलन स्थळावर माजी न्या.कोळसे पाटील व लिंगायत धर्मगुरु कोरणेश्‍वर महास्वामी यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार असून,यावेळी संविधानप्रेमींनी जास्तीत संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.