जिल्ह्यात मंकरसक्रांत सण उत्साहात साजरा

लातूर (प्रतिनिधी):-मंकरसंक्रात सण म्हणजे महिलांच्या उत्साहलाच उदाणच आलेले असते या सणात रूसवे फुगवे बाजूला ठेेवून वर्षभर न बोलणार्‍या नात्यागोत्यांचा सण म्हणूनही ओळखला जातो.तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणून कणभर तिळ देवून मनभर प्रेम द्या व तसेच गुळचा गोडवा आपुलकी वाढवा म्हणत महिला वर्गानी एकमेंकीना वाण वाटप करून मकरसंक्रांतीच्या गळाभेट घेवून शुभेच्छा दिल्या.स्नेहमय संदेश एकमेकांना देत आपले नाते वृद्धीगत आणि दृढ करण्यासाठी तिळगूळ देवून स्नेह भेट घेवून तीळा एवढी माया गुळाएवढी प्रिती सांगणारा मकर संक्रातीचा सण मोठ्या उत्साहात महिलांनी साजरा केला.
 मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.तीळ गुळ घ्या गोड गोड बोला या मकर संक्रांतीनिमित्त म्हणावयाच्या शब्दात ङ्गार मोठा संदेश आपल्या पुर्वजांनी सोडला आहे. त्यात त्वज्ञानही आहे आणि स्नेहही भरलेला आहे.भारतीय संस्कृतीत मकरसंक्रात या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. इंग्रजी महिन्यांनुसार वर्षातील पहिला सण मकरसंक्रात असल्याने याप्रती असलेली उत्सुकता दिसून आली. हिवाळा ऋतूत हा सण येत असल्याने शरीराला उष्णतेची गरज भासते. त्यामुळे या दिवशी तीळ-गूळ देऊनच शुभेच्छा देण्याची प्रथा रुजली आहे. शहरातही पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात ही प्रथा साजरी करीत संक्रातीचा सण नाशिककरांनी उत्साहात साजरा केला. मकर संक्रातीला एकमेकींना वाण देण्यासाठी सुवासिनींना या सणाचे खास आकर्षण असते. नवी कोरी कोळ्या रंगाची साडी परिधान करून गृहिणींना सुगड पूजने केले. तसेच सुगडयाचे वाण देण्याची पारंपरिक प्रथा त्यांनी पार पाडली. महिलावर्ग संक्रातीपासून रथसप्तमीर्पयत साजरी केल्या जाणार्‍या हळदी-कुंकवाच्या प्रथेला यादिवसापासून सुरु वात केली. अनेक महिलांनी संक्रांतीच्या दिवशीच हळदी-कुंकवाचेही नियोजन करून कौटुंबिक उत्सव साजरा केला.
 मकर संक्रांतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या जातीधर्माच्या मित्रमंडळींनी एकत्र येत या सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणो या सणाच्या निमित्ताने निर्माण झालेला सामाजिक सद्भाव कायम टिकून राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच एकत्र येणार्‍या मित्रमंडळींनी एकमेकांना यापुढेही सामाजिक एकात्मता अशीच टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. गेल्या काही दिवसांत घडलेल्या अनपेक्षित घटनांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या समाजांच्या मित्रांनी एकत्र येऊन एकमेकांना तीळगूळ दिल्याने या सणातील गोडवा आणखीच वाढला आहे. 
 सांस्कृतिकदृष्टया या सणाचे ङ्गार महत्त्व आहे. लोक एकमेकांना तिळगूळ देतात व मतिळगूळ घ्या - गोड बोलाफ असे म्हणतात. आपली जुनी भांडणे-वैरे विसरून, पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठी संधीच असते जणू. ज्यांचे संबंध चांगलेच आहेत, त्यांचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी याचा उपयोग होतो.  सूर्याच्या उत्तरायणाने तीळ-तीळ वाढत जाणारा दिवस जेव्हापासून सुरू होतो तो मकरसंक्रातीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वानी एकमेकांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देत ह्यतीळगूळ घ्या, गोड गोड बोलाह्ण, असा स्नेहमय संदेश देऊन नाते वृद्धिंगत आणि दृढ करण्यासाठी तीळगुळाचे वाटप करून स्नेह भेट घेतली.