सिंहाते बंधूची इमानदारी पंच्चाऐशी हजाराची सापडलेली बॅग केली परत


अहमदपूर : ( उदय गुंडीले ) अहमदपूर तालुक्यातील गुट्टेवाडी येथील रहिवाशी गुट्टे ज्ञानोबा संपतराव यांची पंच्चाऐशी हजाराची हरवलेली बॅग सिंहाते बंधु यांनी परत दिली त्याबद्दल समाजामध्ये अनेक इमानदार लोक शिल्लक असल्याचे दाखवून दिले. त्यांनी दाखवून दिलेल्या इमानदारीमूळे त्यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांच्या इमानदारीची एकच चर्चा अहमदपूर शहरात चालू आहे.
          सविस्तर माहिती अशी की, ज्ञानोबा गुट्टे हे बँकेमध्ये भरण्यासाठी घरुन पंच्चाऐशी हजार रुपये बॅगमध्ये घेऊन निघाले. मात्र बँकेचे व्यवहार चालू होण्यास वेळ असल्यामूळे एम.एस.सी.बी. ऑफीसला जाताना पोस्ट ऑफीस मार्गाने जाताना सिंहाते चप्पल मार्टच्या समोर बँग पडली. तेव्हा या दुकानाचे मालक दुर्गाप्रसाद सिंहाते, राजकुमार सिंहाते यांनी ती पडलेली बॅग उचलून पोलीस स्टेशन येथे जमा करून अजून ही इमानदारी शिल्लक असल्याचे दाखवून दिले.तसेच ज्ञानोबा गुट्टे यांनी अहमदपूर पोलिसात पैशाची बँग चोरीला गेल्याची तक्रार केली होती. त्यामूळे त्या बॅगची शहानिशा करून तक्रारदाराकडून ओळख पटवून घेऊन त्यांच्या स्वाधीन केले. त्यामूळे या सिंहाते बंधूच्या इमानदारीमूळे हरवलेले पैसे लवकर मिळाले. असल्यामूळे अहमदपूर पोलिसाच्या  गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने सिंहाते बंधूचा पोलीस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पो.हे.कॉ. सुहास बेंबडे, पो.कॉ. सुनील श्रीरामे, पो.कॉ. रियाज देशमुख, मोहन पांचाळ, चालक सुदर्शन घुगे आदिची उपस्थिती होती.