जिल्हा परिषद जिंदाबाद नाटकाचे प्रयोग राज्यभर व्हावेत-जिल्हाधिकारी


लातूर (प्रतिनिधी):-जिल्हा परिषदेचा वार्षिक क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव सुरु आहे. या महोत्सवानिमीत्य जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी सादर केलेल्या म जिल्हा परिषद जिंदाबादफ या नाटकाने रसिकांची मने जिंकली.  या नाटकाचे प्रयोग सर्वत्र झाले पाहिजेत अशी अपेक्षा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली.
   येथील दयानंद सभागृहात जिल्हा परिषद जिंदाबाद या नाट्यप्रयोगाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत झाला. या नाट्यप्रयोगाचे कथा लेखन, दिग्दर्शन दिपरत्न निलंगेकर यांचे होते.या नाटकामध्ये रत्नराज जवळगेकर, किशोर काळे, वैशाली जमादार,  संतोष जोशी, शुभांगी गुर्वे, बबन हटकर, वसंत गाडेकर, डि.डी.दंडगुले, प्रकाश जाधव, कविता सुर्यंवशी, ओंकार वंजारी, भाग्यश्री सुरवसे, कविता तांबारे, जीवन वाघमारे, सुनिल कुलकर्णी, सतिश रावजादे, गंगाधर शिगे, आनंद गायकवाड, अरुणा पवार, उध्दव फड,  नंदा करडखेले, कांतीकुमार खोबरे, कौशल्या टिपरसे, छाया घायाळ, सतिश कोटमाळे, संगीता बिराजदार, मधूकर सुर्यवंशी, संजय देडे यांचा समावेश होता. 
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावोगावी होणाछया विकास कामांचा संदेश देणाछया या नाट्यप्रयोगात लोकवाट्याचा विषय अत्यंत वस्तुस्थिती दर्शवत मांडण्याचे काम दिग्दर्शक दिपरत्न निलंगेकर यांनी केले तर नाटकातील लोककलावंताची भुमिका साकारणाछया शुभांगी गुर्वे यांनी उपस्थितांच्या डोळयात पाणी आणत, विरोधी पक्षनेते म्हणून भुमिका बजावणारे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे  आणि सत्ताधारी नेत्यांची भुमिका बजावणारे मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर यांचाही दमदार अभिनय सर्वांच्या स्मरणात राहिला. छोटी भुमिका साकारणारे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी साकारलेले डॉ. कलमे या भुमिकेने लक्ष वेधून घेतले. कारवूैन म्हणून काम करणाछया बबन हटकर, केरबाच्या भुमिकेतील डि.डी.दुंडगुले, नाम्याच्या भुमिकेतील व्ही.एन.गाडेकर तर लक्षवेधी गणपाच्या भुमिकेतील सतीश रावजादे यांनीही सर्वांची मने जिंवूैन घेतली. नाटकाची प्रकाश योजना सुधीर राजहंस यांनी तर रंगभुषा भारत थोरात यांनी केली होती.