वाहतुकीचे नियम पाळा..यमाचे निमंत्रण टाळा...!


लातूर (प्रतिनिधी):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व प्रभुराज प्रतिष्ठाण, वाहतूक शाखा नियंत्रण,लातूर यांच्या संयुक्त विद्यामानाने राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा अभियान या अंतर्गत यामाराजाच्या वेशभूषा धारण करून नागरिकांचे लक्ष वेधून वाहतूक नियंत्रणाचे  नियम पालन करण्यासाठी लातूर जिल्हा न्यायालय ते गांधी चौक पर्यंत प्रभातफेरीच्या साह्याने यमराजा कडून वाहनचालकांना वाहतुकीचे नियम सांगून त्यांच्यात जनजागृती करण्यात आले.तसेच मृत्यूला आमंत्रण देऊ नका यमराजाला निमंत्रण देऊ नका असे यमाकडून वाहन चालकांत जनजागृती करण्यात आले वाहतुक नियमाचे नपथनाट्य ही दाखवण्यात आले.
    अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने त्यात नागरिकांना प्राण गमवावा लागत आहे,आणि त्यांच्यावर परिवाराचे उपजीविका अवलंबून असते त्याचा त्रास परिवाराला होतो हे केवळ नागरिकांच्या चुकी मुळे अपघात होतात .वाहतुकीचे नियम न पाळणे मृत्यूस सामोरे जावे लागते याची पूर्ण काळजी वाहन चालकांनी घ्यावी ज्याने आपला ही प्राण वाचेल आणि इतरांनाही त्रास होणार नाहि . ही जनजागृती करणे कळाची गरज आहे या यमराजाच्या वेशभूषेत नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी उपक्रम घेण्यात आला.  उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा न्यायाधीश सुनीता कंकणवाडी,वाहतूक शाखाचे निरीक्षक एस. आय. चाऊस,प्रभुराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड.अजय कलशेट्टी,साहाय्यक निरीक्षक एस. जी. बंकवाड, प्रा. केशव आलगुले, डॉ.प्रमोद चव्हाण,अँइ.सुरेश सलगरे,सचिन कांबळे,अँड.कल्पना भुरे,अँड.ज्योती यावलकर,अँड.सुनंदा इंगळे,अँड.गायत्री नल्ले,अँड.रमेश कुचमे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.